आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला पश्चिममध्ये अटीतटीचा सामना, भाऊ , नाना, ताई, लाला सारेच आपले; मतदारांपुढे पेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- पाचपैकीअकोला पश्चिमकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. एकाच मतदारसंघात दिग्गजांचा आमना-सामना होत आहे. भाऊ, नाना, ताई, लाला सर्वच आपले त्यामुळे कुणाच्या पाठीशी उभे राहावे? अशी संभ्रमावस्था मतदारांमध्ये निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत असल्याने अकोला पश्चिम विधानसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे.

संपूर्ण जुने शहर तसेच टॉवरपासून ते कौलखेड असा नदीपर्यंतचा भाग या मतदारसंघात येतो. या मतदारसंघात ५७ नगरसेवक तसेच २८ प्रभाग आहेत. हा मतदारसंघ एकाही दिग्गजाला नवा नाही. मतदारसंघातील समस्यांपासून ते नागरिकांपर्यंत कमी जास्त प्रमाणात सर्वच दिग्गजांच्या ओळखी आहेत. जुने शहर आतापर्यंत युतीचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु, आता भाजप आणि सेना एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, तर काँग्रेसचे १७, भाजपचे १५, शिवसेनेचे सात नगरसेवक आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणावी तेवढी पकड नाही. परंतु, विजय देशमुख यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातील २८ प्रभागांचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस वगळता सेना, भाजप, काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे. परंतु, काँग्रेसने सहा नगरसेवकांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता काँग्रेस नगरसेवकांची संख्या खऱ्या अर्थाने ११ झाली आहे. निलंबित केलेले हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील.