आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला दिलेलं मत भाजपकडे जाणार, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केला आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- लोकसभानिवडणुकीनंतर भाजप-शिवसेनेची युती मोडकळीस आल्यावर राष्ट्रवादीने काँग्रेसची साथ सोडून भाजपसोबत छुपी युती केली. परिणामी, विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं प्रत्येक मत हे भाजपचं असल्याचा आरोप अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांनी केला.

अकोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उषाताई विरक यांच्या प्रचारासाठी मंगळवारी खदानस्थित कामगार कल्याण केंद्राजवळ प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलत होते. लोकसभेत काँग्रेसला मिळालेल्या पराजयानंतर काँग्रेसने महिला उमेदवाराला विधानसभेचे तिकीट देण्याचे धाडस दाखवले आहे. विधानसभेसाठी काँग्रेसने कंबर कसली असून, भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडल्यानंतर राष्ट्रवादीने बंडखोरी केल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला तसेच राष्ट्रवादीने भाजपशी हात मिळवणी करून छुपी युती केल्याचा आरोपदेखील वासनिक यांनी केला.
भाजप, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भारिपवरदेखील त्यांनी टीकास्त्र सोडले. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात भाजपचा नििष्क्रय उमेदवार निवडून येत असून, याला भारिप जबाबदार असल्याचा आरोपदेखील त्यांनी या वेळी केला. प्रचार सभेला अकोला पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उषाताई विरक, अनिल साळवी, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, रमाकांत खेतान, काँग्रेस महानगराध्यक्ष मदन भरगड तसेच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आयोजित सभा नियोजित वेळेपेक्षा जवळपास दाेन तास उशिरा सुरू झाल्याने उपस्थित कार्यकर्त्यांची गर्दी कमी होत गेली.