आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवकालीन मराठी बाण्यातून संदेश; मुख्याध्यापकांनी केली मतदार जागृती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- कोणत्याहीखोट्या प्रचाराला बळी पडता येत्या १५ ऑक्टोबर रोजी मतदान केल्याशिवाय राहू नका, असे आवाहन करण्यासाठी भौरद येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी केले आहे. मतदानविषयक जनजागृती करण्यासाठी देशमुख यांनी स्वत: शिवकालीन मराठी बाणाचा पेहराव स्वीकारला आहे.
जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन मतदार जनजागृती करणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख यांनी दोन दिवसांपासून शहर तसेच ग्रामीण भागात दुचाकीवर फिरून मतदार जनजागृती सुरू केली आहे. त्यांच्या या कार्यात त्यांचे मित्र शिक्षक आर. एम. राठोड यांची साथ त्यांना लाभत आहे.
चला चला रे मतदानाला चला
लक्षातअसू द्या, कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी पडता येत्या 15 ऑक्टोबरला मतदान केल्याशिवाय राहू नका. चला गड्यांनो मतदान करून संविधानाचा सन्मान आणि लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवू या. चला आता मतदानाला चला, भारताला बलशाही बनवू या.'' सर्जेरावदेशमुख, मुख्याध्यापक
जिल्हािधकारी कार्यालयासमोर मतदान जनजागृती करताना भौरद येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख.