आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता, जनजागृती अभियानात अनेक संघटनांचा सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- विधानसभा निवडणुकीत या वेळी प्रशासनाने मतदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला. या प्रयत्नात शहरातील विविध संघटनाही सहभागी झाल्या, त्यामुळे मतदार जनजागृती अभियानाला कधी नव्हे एवढे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मतदानात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, महापालिका प्रशासन तसेच विविध सामाजिक संघटना, महाविद्यालये, शाळा आदी सर्वच सहभागी झाले होते. जिल्हा प्रशासनाने तर विद्यार्थ्यांना आई-बाबांना मतदान करण्याची आठवण करून देण्याचा गृहपाठच दिला होता, तर पोलिस प्रशासनानेही जनजागृती फेरी काढून मतदारांना निर्भयतेने मतदान करण्याचे आवाहन केले.याच प्रमाणे शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी फेरी तसेच पथनाट्याच्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नांमुळे कधी नव्हे ती घराघरात मतदानाबाबत चर्चा होताना दिसते. त्यामुळे मागील निवडणूकीपेक्षा या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.