आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Association Tense Permanent Role; Municipal Staff Strike Continues

संघटनेची ताठर भूमिका कायम; मनपा कर्मचार्‍यांचा संप सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-मनपा कर्मचार्‍यांचा संप नवव्या दिवशी सुरूच असून, यावर आज तोडगा निघाला नाही. प्रशासनाने काल झालेल्या बैठकीत संप मिटवण्यासाठी प्रयत्न केला. पण, यावर कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी आडकाठी आणली. न मिळालेल्या निधीची मागणी करत नवा पायंडा कर्मचारी संघटना पाडत आहे.

दोन महिन्यांच्या पगाराची प्रशासनाची तयारी आहे, असे असताना संप का सुरू आहे, असा मुद्दा उपस्थित होतो. कर्मचार्‍यांची पूर्ण देणी द्या, संप मागे घेऊ, असे मत संघर्ष समितीचे अध्यक्ष पी. बी. भातकुले यांनी व्यक्त केले. दरम्यान, याविषयी आज प्रशासनाचा प्रस्ताव मान्य करण्याची मागणी भारिप-बमसंचे मनपा समन्वयक डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली. पुंडकर यांनी कर्मचारी कराच्या वसुलीत कमी पडल्याचे मत व्यक्त केले आहे. याविषयी आज आमदार दिवाकर रावते यांनी अधिकार्‍यांना यावर तोडगा काढण्याचा आदेश दिला. जनतेचे हाल होऊ नये, यासाठी अधिकार्‍यांनी पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी नोंदवले.

प्रशासन व पदाधिकार्‍यांमुळे हा संप सुरू असून, त्यांच्या निष्काळजीपणाने संप होत आहे, असा आरोप त्यांनी केला. आमदार रावते यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रभारी आयुक्त डॉ. उत्कर्ष गुटे, शिवसेना जिल्हाप्रमुख र्शीरंग पिंजरकर, राजेश मिर्शा, शहरप्रमुख तरुण बगेरे, गटनेत्या मंजूषा शेळके उपस्थित होत्या.