आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिहरपेठेतून केले देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - देशीबनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जुने शहरातील हरिहरपेठेतील राजकुमार उर्फ राज अरुण यादव याच्या घरातून जप्त करण्यात आली. ही कारवाई आज, शनिवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. पिस्तूल तस्करी करणाऱ्या टोळीला पोिलसांनी अटक केली आहे. खदान परिसरात काल पोिलसांनी तलवारी, जंबिये, गुप्ती आणि चाकू जप्त केले होते. त्याला एक दिवस होत नाही, तोच स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी दुसरी कारवाई केली आहे. पोिलसांनी दिलेल्या मािहतीनुसार, शिवणीतील क्रांतीनगर येथील अमोल नंदकिशोर साळवे हा मध्य प्रदेशातील खंडवा येथून पिस्तूल आणि काडतुसे विकत आणतो. या शस्त्रांची विक्री तो कोळसा येथील उमेश गुलाबराव सोळंके आणि लोहगड येथील उमेश रमेश जोंधळे यांच्या मदतीने शहरात करतो. त्यासाठी बार्शिटाकळी येथील अमोल काशिराम जामनिक हा ग्राहक आणण्याचे काम करतो, तर सोपीनाथनगरमध्ये राहणारा पवन एकनाथराव गावंडे राहुल श्यामकुमार शर्मा हे दोघे ग्राहकांसोबत मध्यस्थी करतात.

राजकुमारउर्फ राज अरुण यादव याला पिस्तूल विकली होती. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याच्या घरी दुपारी १२ वाजता छापा टाकला. त्यात त्याने कपाटात लपवून ठेवलेले एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना घरझडतीत मिळाले. त्याची किंमत २५ हजार २०० आहे. आजच्या कारवाईमुळे अकोल्यातील अवैध शस्त्रांबाबत असलेली मािहती पुढे येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी जुने शहर पोिलसांनी सर्व सातही आरोपींविरुद्ध वििवध कलमांन्वये गुन्हे दाखल केले आहेत. रविवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एसपींनी केले टाइट : तत्कालीन पोिलस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या कार्यकाळामध्ये शहरामध्ये पोिलसिंग आहे की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत होते. मात्र, चंद्र किशोर मीणा यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर शहरामध्ये पोिलसिंग दिसून येत आहे आणि कारवायांसंदर्भात त्यांनी पोिलस अधिकाऱ्यांना टाइट केले असल्याचे कारवायांवरून दिसून येत आहे. मात्र, शहरातील अवैध वाहतुकीसंदर्भात पोिलस अधीक्षकांनी लक्ष गरज घालण्याची मागणी होत आहे.