आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अथर्व, नयनने पटकावले विदर्भ क्रिकेट संघात स्थान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-मध्य विभागांतर्गत नागपूर येथे 27 जानेवारीपासून सुरू झालेल्या 14 वर्षांखालील दोन दिवसीय राजसिंग डुंगरपूर चषकासाठी विदर्भ संघ जाहीर झाला असून, अकोला क्रिकेट क्लबचे खेळाडू अथर्व तायडे व नयन चव्हाण यांना संघात स्थान मिळाले आहे. या संघात अथर्वला विदर्भाचे कर्णधारपद मिळाले आहे.
यापूर्वी अथर्व व नयनने मध्य प्रदेशात झालेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली होती तसेच या वेळी नागपूर येथे निवड चाचणी सामन्यात दोघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यामध्ये अथर्व तायडे याने उल्लेखनीय शतके केली. तसेच 27 जानेवारीला छत्तीसगड संघाविरुद्ध सुरू झालेल्या सामन्यात कर्णधार अथर्व तायडेने 125 धावांची खेळी केली, अशी माहिती विदर्भ क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक भरत डिक्कर यांनी दिली.
अथर्व व नयन यांच्या निवडीबद्दल अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानुभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, दिलीप खत्री, कैलास शहा, भरत डिक्कर, मुन्ना खान, अशोक ढेरे, नंदू गोरे, विवेक बिजवे, जावेद अली, परिमल कांबळे, सुमेद डोंगरे, देवकुमार मुधोळकर, एस. टी. देशपांडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.