आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Athawale Group Started Kargil Vijay Rally At Akola

कारगिल विजय दिन, रिपाइं आठवले गटातर्फे कारगिल विजय रॅली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हुतात्म्यांचे स्मरण सदैव ठेवावे, असे आवाहन माजी सैनिक प्रकाश दाते यांनी अकोला-वाशीम जिल्हा वायुसेना माजी सैनिक संघटना व ग्राहक पंचायतच्या वतीने हुतात्मा स्मारकाच्या आवारात आयोजित 15 व्या कारगिल विजय दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रारंभी शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 26 जुलै रोजी भारताच्या निडर सैनिकांनी कारगिल येथे पाकिस्तानचा पराभव केला. त्या विजयानिमित्त शनिवारी सकाळी 7.55 वाजता झालेल्या या कार्यक्रमात स्काड्रन लिडर (निवृत्त) प्रल्हाद राजगुरू यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहिले. या वेळी झालेल्या परेडचे संचलन बाळकृष्ण काळपांडे यांनी केले.

कृष्णा उपाध्ये हिने ‘ए मेरे वतन के लोगो’ गीत सादर केले. या वेळी ग्राहक पंचायतचे सुधाकरराव जकाते, कारगिल युद्धात सहभागी झालेले सुनील उपाध्ये, संजय तडस, प्रभाकर काटकर, अशोक परळीकर, प्रकाश देशमुख, वासुदेव सरप, रमेश काकड, हवालदार मंसाराम, सोनटक्के, संगीता तडस, प्रबोधिनी उपाध्ये, प्रदीप दाळू, अनंत साबळे उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे 26 जुलै रोजी कारगिल विजय रॅली काढण्यात आली. 26 जुलै या तारखेस भारतीय सैन्याने पाकिस्तानावर कारगिल येथे विजय संपादन केला होता. अकोला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष डी. गोपनारायण यांच्या आदेशावरून हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. हुतात्मा मदनलाल धिंग्रा यांच्यासह शहीद अमर जवानांना या वेळी आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला सूर्यकांत ओईंबे, धम्मदीप धनद्रव्ये, रोहित वानखडे, रोहण इंगळे, तुषार ठोके, भारत तारक, सुरेश दामोद, अनंत भगत, अजय शिरसाट, अजय गवई, बुद्धभूषण डी. गोपनारायण, अजय सदांशिव, गणेश अंजनकर, शुभम तेलगोटे, प्रीतेश अहीर, विजय भगत उपस्थित होते.