आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्त गुडेवार, डॉ. डागा यांच्यावर ‘अॅट्रॉसिटी’ गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - जवळच्या व्यक्तीला एका कामाच्या खरेदीची वर्कऑर्डर दिल्याने चिडून जातिवाचक शिवीगाळ करून धमकावल्या प्रकरणी महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार डॉ. कांतिलाल डागा यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी) दाखल झालेल्या गुन्ह्याची पुढील सुनावणी फेब्रुवारीला होत आहे.

वऔद्यकीय अधिकारी प्रसाद मरेप्पा कुमार (वय ३४, रा. गांधीनगर) यांच्याकडे पालिकेने तत्कालीन प्रभारी आरोग्याधिकारी शहाजी गायकवाड यांच्या स्वेच्छानिवृत्तीपश्चात स्पेशल चार्ज दिला होता. एप्रिल २०१४ रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयुक्त कार्यालयात ही घटना घडली होती. आयुक्तांनी निविदेतील नमूद कंटेनर खरेदीच्या ठेक्याचे काम त्यांच्या जवळच्या माणसास द्यावे, असे सांगितले. हे काम नियमबाह्य आहे असे कुमार यांनी बोलताच आयुक्तांनी त्यांना तू नीट काम करत नाही, घरी पाठवतो. तुमची जात काय आहे? हे मी तुम्हा लोकांना दाखवून देतो असेही ते म्हणाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आहे. सध्या हे प्रकरण न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांच्या न्यायालयात सुरू आहे.

७६ वयाचे डॉक्टर
याप्रकरणातील दुसरे आरोपी डॉ. कांतिलाल पन्नालाल डागा यांचे वय ७६ वर्षे आहे. उच्च न्यायालयाचे निकाल असे आहेत की निवृत्त व्यक्तीला नेमणूक करता येत नाही. तरीही ५८ ते ६० या निवृत्ती वयापश्चात नियमबाह्य नियुक्ती करण्यात आली. यात शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. सदरहू दीड कोटीचे कंटेनर खरेदीची निविदा होती केवळ चुकीचे काम करीत असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने हा त्रास कुमार यांना देण्यात आला, म्हणून हा खटला विशेष क्रिमिनल केस प्रकारात वर्ग झाला असल्याची माहिती अॅड. एम. डी. बिराजदार यांनी दिली