आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिजापूरमध्ये अल्पवयीन मुलीची छेडछाड, गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- येथील स्टेशन विभागातील एका मुलाने शिकवणीवरून घरी जात असलेल्या अल्पवयीन १५ वर्षीय मुलीची छेड काढली. तसेच मुलीच्या मागे गाडी चालवून हाॅर्न वाजवून तिला धक्का मारल्याची तक्रार मुलीने मूर्तिजापूर पोलिसांत दिली.

पळसो बढे येथील अल्पवयीन १५ वर्षीय मुलगी शिकवणीवरून घराकडे जात होती. दरम्यान, आरोपी प्रसाद धारपवार याने दुचाकीवरून मुलीचा पाठलाग करीत हॉर्न वाजवून मुलीस मागून धक्का मारला. याबाबतची तक्रार मुलीने पोलिसांत दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रसाद धारपवारविरुद्ध १५२/१५ चे कलम ३५४, २/३ आर. डब्ल्यू. ८/१२ पोलिस अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार आहे. ही घटना २२ जूनच्या रात्री वाजता घडली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हेमंत चौधरी, पोलिस कॉन्स्टेबल गणेश कवळकार करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...