आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'छावा'च्या कार्यकर्त्यावर हल्ला, चाकू, तलवारीने मारून केले जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- छावा संघटनेचे कार्यकर्ते पंकज रामदास काळे यांच्यावर शुक्रवारी रात्री १० वाजता अज्ञात मारेकऱ्यांनी तलवार,चाकूने वार केले. यात पंकज हे गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी तोंडावर रुमाल बांधून लाइट बंद करून हल्ला केला. अंधाराचा फायदा घेत हल्लेखोर पळाले.
मोठी उमरीमधील कपिलेश्वर पॉइंटजवळ पंकज काळे हे राहतात.
शुक्रवारी रात्री १० वाजता पंकज त्यांच्या ओळखीच्या मुलीला घेऊन डॉ. विजय दामले यांच्या रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर ते बाहेर उभे असताना अचानक लाइट बंद झाले. अंधारात चार जण हातात तलवार आणि चाकू घेऊन पंकजच्या पाठीमागून आले. त्यांनी लगेच त्यांच्यावर चाकू आणि तलवारीने सपासप वार केले. या वेळी गंभीर जखमी झालेल्या पंकजने आरडाओरड केल्यामुळे मारेकरी पसार झाले.
हल्ल्यामध्ये डोक्यावर तलवारीचे गंभीर वार, तर डाव्या हाताच्या मनगटाला, दोन्ही पायांच्या मांडीवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर पंकज यास तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पंकज काळे यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी भादंवि ३२६, ३४ अन्वये अज्ञात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी या प्रकरणातील एकाही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती.
लोखंडीपाइप जप्त : पोलिसांनीरात्री घटनास्थळावर धाव घेतली. या ठिकाणाहून पोलिसांनी दोन लोखंडी पाइप जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला असता आरोपी सापडले नाहीत. हल्ल्यामध्ये तलवार की चाकू वापरला, याचा तपास पोलिस करत असून, आरोपींचा शोध घेत आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा या घटनेच्या संबंधित आणखी माहिती...