आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यावर हल्ला; साडेपाच लाख लुटले, पोलिसांची शोधमोहीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तोष्णीवाललेआउटमध्ये गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता एका व्यापाऱ्यावर गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये व्यापारी रक्ताच्या थारोळ्यात पडताच त्याच्याजवळील साडेपाच लाख रुपयांची थैली त्यांनी पळवली. व्यापाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दूध डेअरीच्या पाठीमागे ३० नंबर विडीचे व्यापारी पंकज जयंतीभाई पटेल (वय ४८) हे राहतात. बुधवारी बँका बंद असल्यामुळे त्यांना त्या दिवसाची रक्कम बँकेत जमा करता आली नाही. त्यामुळे ते आज, गुरुवारी साडेपाच लाख रुपयांची रक्कम बँकेत भरण्यासाठी घरून एमएच ३० एजे ६६३३ क्रमांकाच्या अॅक्टिव्हा गाडीने निघाले. त्यांच्या घरापासून ५०० मीटरच्या जवळपास बोळीमध्ये काही गुंड दबा धरून बसले होते. पंकज पटेल हे घरून निघताच त्यांच्यावर दोघांनी हल्ला चढवला. जवळच असलेल्या िभंतीचा सिमेंटचा पाइप तोडून त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. त्यात ते गंभीर जखमी झाले आणि कोसळले. त्यातच दोघा गुंडांनी त्यांच्याजवळील पैशाची थैली हिसकली आणि राष्ट्रीय महामार्गाच्या दिशेने पळ काढला. त्यानंतर दोन दुचाकी गाड्यांवरून ते गोरक्षण रोडकडे भरधाव सुटले. एका जणाने त्यांचा पाठलाग केला, मात्र ते पुढे गल्लीबोळातून बेपत्ता झाले. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पो िलस घटनास्थळी दाखल झाले.

२४ तास हवेत पोलिस
द्वारकानगरीमध्येपोिलस चौकी उभारली. मात्र, या पोिलस चौकीमध्ये पोिलस नाहीत, असा आरोप नगरसेवक आशीष पवित्रकार यांनी केला. या घटनेनंतर त्यांनी पोिलस अधीक्षक यांना एक पत्र दिले, त्या पत्रामध्ये त्यांनी २४ तास दोन पोिलसांना चौकीमध्ये तैनात करावे, अशी िवनंती केली आहे. गुन्हेगारीविषयी त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

गुन्हेगारीच्या घटनांमध्ये झाली वाढ
सिव्हिललाइन्स पोिलस ठाण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चार दिवसांपूर्वी न्यू तापडियानगरमध्ये एका िबल्डरला खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. बांधकामाच्या साइटवर असलेल्या एका जणाला मारहाणही करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, मात्र आरोपीचा शोध अद्यापही लागला नाही. १५ दिवसांपूर्वीसुद्धा तोष्णीवाल लेआउटमध्ये घटना घडली.