आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचावर झाला प्राणघातक हल्ला; राजनापूर खिनखिनी येथील घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर- अवैध दारू विक्री, ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमण हटवल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर खिनखिनीचे सरपंच योगेश उर्फ गुड्ड बाबुरावजी साबळे (38) यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना 25 डिसेंबरला घडली. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोल्यातील आयकॉन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. यासंदर्भात पोलिसांसह ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सरपंच योगेश साबळे हे वीटभट्टीवरील मजुराला बोलावण्यासाठी त्याच्या घरी जात होते. दरम्यान सहा जणांनी त्यांच्याशी पूर्ववैमनस्यातून वाद घातला. त्यांच्यावर पाइप, विळ्याने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच माना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अवैध दारू अड्डे आणि अतिक्रमण हटवल्याने केला हल्ला : काही दिवसांपूर्वी गावातील ई-क्लास जमीन मोकळी करण्यात आली तसेच अवैध दारू विक्रीही बंद केली. त्यामुळे अनेक जण दुखावले गेले. त्यानंतर सरपंच योगेश साबळे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली.
हल्लेखोरांनी सरपंचांना ठेवले डांबून : सरपंच योगेश साबळे यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांना एका खोलीत डांबून ठेवले तसेच बाहेरून कुलूपही लावले. काही वेळाने गावात सरपंच साबळेंवर हल्ला झाल्याची वार्ता वार्‍यासारखी पसरली. साबळे यांचे नातेवाईक आणि मित्रांनी धाव घेऊन त्यांना रुग्णालयात भरती केले.
प्रकृती स्थिर : जखमी योगेश साबळे यांची प्रकृती स्थिर आहे,अशी माहिती आयकॉन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली. त्यांच्या हाता,पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.