आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवक हल्ला प्रकरण; आरोपी अजूनही फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिवाजी महाविद्यालयासमोर सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आलेल्या युवकाची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या प्रकरणातील एकही आरोपी पोलिसांच्या हाती आला नसून, पोलिस आरोपींच्या शोधात आहेत.
युवराज फकिरा आपोतीकर (वय १९) याच्यावर हल्लेखोरांनी मोटारसायकलवर येऊन कत्ता,लोखंडी पाइपने डोक्यावर मानेवर वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवराजवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती स्थिर होती. या प्रकरणी पोलिसांनी विजयनगर येथील कालू विरावंडे (वय २३), सूरज कलाने (वय २३), छोटू थामेत (वय २५), प्रेम उर्फ पिया खरे (वय २७), शुभम पाराचे (वय २४), तिलक सारवान (वय २४), कपिल सारवान आणि लखन डागोर यांना आरोपी करण्यात आले असून, ते फरार आहेत.

आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना : आरोपीहल्ला करून पसार झाले आहेत. त्यांच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या प्रकरणातील एका आरोपीचा सहभाग अकोट रोडवरील पेट्रोलपंपावर टाकलेल्या दरोड्यात होता. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला आहे.

देशमुखफैल,विजयनगरात पोलिस बंदोबस्त : घटना घडल्यापासून पोलिसांनी देशमुखफैल आणि विजयनगरमध्ये तगडा पोलिस बंदोबस्त लावला आहे. या ठिकाणी आरसीपी आणि पोलिस मुख्यालयातील जवान तैनात आहेत. त्यामुळे येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. या परिसरात जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा आणि शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गस्त घालून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. '