आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल योजनेतून घरकूल बांधून मिळावे यासाठी पालिकेसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मलकापूर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील रहिवाशांना घरकुल योजनेतून घरकूल बांधून मिळावे, तसेच कायमपट्टा द्यावा या मागणीसाठी आज १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता नगरपालिका कार्यालयासमोर दोघांनी स्वत:चे अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांसह एका अन्य महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जुना वार्ड क्रमांक १० म्हणजे प्रभाग क्रमांक मधील भारती शिवदास सोमवंशी गणेश पांडुरंग इंगळे यांनी ११ नोव्हेंबर रोजी नगर पालिकेला निवेदन दिले होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर प्रभाग क्रमांक १० मधील घरकुलाचा प्रश्न आजतागायत सुटला नाही. उपोषण, मोर्चे काढूनही फक्त खोटी आश्वासने देण्यात आली. एकप्रकारची हेळसांड पालिका प्रशासनाकडून होत आहे. नगरसेवक आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. तरी घरकुल याेजना लवकरात लवकर अंमलात आणल्यास १७ नोव्हेंबर रोजी आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा भारती सोमवंशी गणेश इंगळे यांनी दिला होता. या इशाऱ्यानुसार दोघांनीही आज दुपारी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

४९६घरकुलांचे बांधकाम प्रस्तावित : एकात्मिकगृहनिर्माण झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा क्रमांक अंतर्गत शहरातील १,३९५ घरकुल पायाभुत सुविधा विकास कामांचे प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे.त्यानुसार प्रभाग क्रमांक मधील ४९६ घरकुलांचे बांधकाम प्रस्तावित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात प्रत्येकी १२ घरकुले असलेल्या बहुमजली इमारती प्रस्तावित केल्या असून एकुण १०८ घरकुलांचा समावेश आहे.
२६ ऑगस्ट २०१३ रोजी पालिकेने ठराव पारित करुन तूर्त या ठिकाणी मंजूर बांधकामास स्थगिती देतांनाच स्थानिक रहिवाशांना अभिन्यांस तयार करुन त्याठिकाणी कायम स्वरुपी पट्टे देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कायम पट्ट्यांचा प्रस्ताव जिल्हािधकाऱ्यांकडे पाठवणार
^घरकुलयोजनेच्या कामासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे पालिकेने हजार रुपये भरुन जागेची मोजणी १९ सप्टेंबर २०१४ रोजी केली आहे. प्रस्तुत योजनेत मूलभूत स्वरुपाचा बदल करण्यात आला आहे. घरकुल बांधकाम करण्यात येणार आहे. परंतु आत्मदहन करणाऱ्यांना कायमस्वरुपी पट्टा पाहिजे असून हे काम पालिकेकडे येत नाही. त्यामुळे तसा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवण्यात येणार आहे. शहरामधील कैकाडीपुऱ्यातील दुमजलीचे काम होत असून ग्रेन मार्केटच्या दक्षिण बाजुच्या भागाचा हा प्रश्न आहे. तो लवकरच सोडवण्यात येईल.
तुकारामअंभोरे पाटील, नगराध्यक्ष

बुलडाणा येथील प्रभाग क्रमांक मधील भारती शिवदास सोमवंशी तसेच गणेश पांडुरंग इंगळे यांनी घरकुल बांधून मिळावे, यासाठी वेळोवेळी निवेदने सादर करून नगरपालिकेकडे मागणी केली. परंतु अद्याप त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यामुळे मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेवटी आज १७ नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांनी घरकुलाच्या मागणीसाठी बुलडाणा नगरपालिकेसमोर अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
>घरकुलाचे बांधकाम, कायमपट्टाच्या मागणीसाठी केले आंदोलन
>अंगावर रॉकेल ओतून घेताच महिला-पुरुष दोघांना पोलिसांनी रोखले
ऑटोतून आले आत्मदहनकर्ते
पोलिसांचाप्रचंड बंदोबस्त असताना दुपारी ठीक बारा वाजता भारती सोमवंशी गणेश इंगळे हे रॉकेल घेऊन ऑटोने नगर पालिकेसमोर आले. यावेळी अॉटोत बसलेले असतानाच दोघांनीही कॅनमध्ये आणलेले रॉकेल अंगावर ओतले. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच चालू ऑटोतून दोघांनाही खेचून काढण्यात आले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना थांबवण्यासाठी पोलिसांना धावपळ करावी लागली.
आत्मदहन करण्याबाबत बजावली नोटीस
घरकुलबांधकाम कायम पट्टे देण्याबाबत नगर पालिकेची कार्यवाही सुरू आहे. या ठिकाणी बहुमजली इमारत बांधकामाला नगरसेवकांनी हरकती घेतल्याने बांधकाम करता आले नाही. नगर पालिकेकडून जागेचे कायम पट्टे देणे घरकुल बांधकामांसंदर्भात प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. तरी आत्मदहनाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, असे पत्र दोघांनाही बुलडाणा नगर पालिकेने १५ नोव्हेंबर रोजी दिले होते. त्यानंतरही हे आंदोलन छेडण्यात येऊन आज आत्मदहनाचा प्रयत्न झाला.