आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attempted Suicides Farmers Conjugal; Stable Nature Of Treatment

शेतकरी दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; उपचारानंतर प्रकृती स्थिर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बोरगावपासून जवळच असलेल्या पैलपाडा येथील एका शेतकर्‍याच्या शेतात महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे सात टॉवर उभारणीचे काम पुन्हा सुरू केल्याने या शेतकरी दाम्पत्याने मंगळवारी दुपारी 11.30 वाजताच्या दरम्यान शेतातच आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्या दोघांनाही मूर्तिजापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बाळू भालतिलक (40) यांचे तानखेड शिवारात सात एकर शेत आहे. या शेतात पारेषण कंपनीने सात टॉवर उभारणीचा निर्णय घेतला आहे. हे टॉवर उभारण्यासाठी पारेषण कंपनीने एका खासगी कंपनीला हे काम दिले आहे. एकाच शेतातून हे टॉवर घेतल्यामुळे बाळू भालतिलक यांनी यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर शेतकरी आणि पारेषण कंपनी यांच्यामध्ये बोलणी होऊन एक करार झाला आणि शेतकर्‍याला नुकसानभरपाई देण्याचे ठरले होते. मात्र, उपजीविकेचे साधन असलेली शेती या टॉवरमुळे कशी पेरायची, असा प्रश्न या शेतकर्‍यासमोर निर्माण झाल्याने शेतकर्‍याने डिसेंबरमध्ये टॉवरचे काम बंद पाडले होते. मात्र, आज पुन्हा हे काम सुरू करण्यात आल्याने बाळू भालतिलक आणि त्यांची पत्नी गीता यांनी आज शेतातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
दरम्यान, या शेतात काम करणार्‍या पारेषण कंपनीच्या कामगारांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या दाम्पत्याला मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. या दाम्पत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आमदारांनी दिले होते काम थांबवण्याचे निर्देश :
5 डिसेंबर 2013 रोजी संबंधित कंपनीने पोलिसांच्या ताफ्यासह येथे काम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमदार हरीश पिंपळे यांनी घटनास्थळावर धाव घेऊन 25 डिसेंबरपर्यंत काम थांबवण्याचे निर्देश दिले होते. नुकसानभरपाई दिल्यानंतरच काम सुरू करण्याचे त्यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांना सांगितले होते.