आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या , जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सर्व बँक अधिकाऱ्यांना कानपिचक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - वाहनकर्जासह इतर कर्जांचे वाटप करताना जागृतता ठेवली जाते. त्यासाठी संबंधितांशी संवाद साधल्या जातो. मात्र, हा प्रकार शेतकऱ्यांसोबत होतो का? जरा शेतकऱ्यांकडेही लक्ष द्या, अशी समज जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात मंगळवार, २३ जून रोजी अकोला वाशीम जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांनी पीक कर्जाचा आढावा घेतला.
या वेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह, विभागीय सहनिबंधक गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक ज्ञानदीप लोणारे, वाशीम उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, लीड बँकेचे मॅनेजर तुकाराम गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शैलेश हिंगे अकोट यांच्यासह अकोला वाशीम जिल्ह्यातील सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. वाशीमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कर्जाचेउद्दीष्टपूर्ती चिंताजनक : अकोलावाशीम जिल्ह्यातील कर्जाची उद्दिष्टपूर्ती चिंताजनक अाहे.
विदर्भग्रामीण बँकेचे अभिनंदन : सर्वांतजास्त कर्ज प्रकरणे निकाली काढल्याबद्दल विदर्भ ग्रामीण बँकेचे अभिनंदन या वेळी करण्यात आले. िवदर्भ ग्रामीण बँकेचा आदर्श इतर बँकांनी ठेवावा, असा टोलाही जिल्हाधिकाऱ्यांनी लगावला.
एसडीओघेणार फॉलोअप : अकोलातालुक्यातील कर्ज प्रकरणांचा फॉलेाअप घेण्याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली. कर्ज प्रकरणांचा फॉलेाअप घेण्यासाठी इतरही उपविभागीय अधिकारी तहसीलदारांनी काम करावे, अशा सूचनाही िदल्या.
वेळेतमिळत नाही रिपोर्ट
बँकअधिकाऱ्यांकडून कर्ज प्रकरणाचा रिपोर्ट अद्ययावत होत नाही, अशी तक्रार लीड बँकेचे मॅनेजर तुकाराम गायकवाड यांनी केली. बँक अधिकाऱ्यांनी दैनंिदन अहवाल सादर करावा, असे निर्देश िवभागीय आयुक्तांनी िदले.
प्रकरणे निकाली काढा
आर्थिकसंकटात सापडलेला असून आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांना नव्याने कर्जपुरवठा करून पीक कर्ज पुनर्गठनावरही भर द्या. जून अखेरपर्यंत सर्व कर्ज प्रकरणे निकाली काढा, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी अधिकाऱ्यांना िदल्या.

...तर बँकांवर कारवाई
कर्जप्रकरणास नकार देणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांची तक्रार आल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी िदले आहेत. बँक अधिकाऱ्यांनी कर्ज प्रकरणाला प्राधान्य देण्याचे आश्वासन आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
बातम्या आणखी आहेत...