आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aurangabad's Police Inspector Arrested In Bribe Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादच्या पीआयला लाखांची लाच घेताना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - औरंगाबादयेथील एका पोलिस निरीक्षकाला लाख रुपयांची लाच घेताना शेगाव येथे शुक्रवारी रात्री रंगेहात अटक करण्यात आली. शिवाजी अवधुतराव ठाकरे असे या पोलिस निरीक्षकाचे नाव असून तो औरंगाबाद क्राइम ब्रँचमध्ये कार्यरत आहे. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हा सापळा शेगाव - खामगाव रोडवर शुक्रवारी रात्री १० .३० वाजताच्या सुमारास लावला होता.
याप्रकरणी एसीबीकडून मिळालेली माहिती अशी की, नोटांचा पाऊस पाडण्याच्या प्रकरणात औरंगाबाद क्राइम ब्रँचने बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील एका जणास सहभाग असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. मात्र, त्याला निर्दोष करण्यासाठी त्याच्याकडून शिवाजी ठाकरेने १० लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी पाच लाख शेगावला स्वीकारण्याचे ठरले होते.

आैरंगाबाद सिडको एमआयडीसी परिसरात साहेबखान नावाचा भोंदू बाबा आहे. त्याचा पर्दाफाश झाला होता. पैसे चौपट करून देण्याच्या प्रकरणात साहेबखान त्याच्या काही एजंटविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. साखरखेर्डा येथील एकाला औरंगाबाद क्राइम ब्रँचने ताब्यात घेतले होते. प्रकरणाचा तपास ठाकरेकडे होता. त्याने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीस आरोपी करतो एटीएसच्या ताब्यात देतो, म्हणून धमकावले. त्याबदल्यात सोडण्यासाठी त्याच्याकडे १० लाख रुपयांची मागणी केली होती. दीड महिन्यापूर्वी तक्रारदाराकडून५० हजार एक लाख रुपये चेकने घेतले होते. पाच लाख रुपये शेगावला देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदाराने अकोला एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीचे पोलिस उपअधिक्षक उत्तमराव जाधव यांनी सापळा रचला.

काय होते प्रकरण
भोंदूबाबा साहेबखान हा चौपट पैसे करून देण्याचे आमिष देत होता. लाखाच्या बदल्यात तो चार लाख द्यायचा. त्याने धान्याच्या कोठीला एक झाकण लावलेले होते. खालच्या साइडने तो रिकामे दाखवायचा. मला पूजा करायची आहे. पाच मिनिट बाहेर थांबा, असे म्हणायचा. स्प्रिंगने दुस-या झाकणात पैसे अॅडजस्ट करायचा. स्प्रिंग ओढली की, पैसे पडायचे. असे करून त्याने लोकांचा विश्वास संपादन केला. मार्केटमध्ये एजंट सोडले. लोक लाखो रुपये आणायचे. तो त्यांना पूजा करायची म्हणून कॅनमधून ऑइल आणायला सांगायचा नंतर पोलिसांना माहिती द्यायचा. पोलिस धाड टाकायचे. पोलिसांचाही त्यात सहभागी होता. अंधश्रद्धा कायद्यात अडकवण्याचा धाक पोलिस दाखवायचे लोक पळून जायचे. ज्याच्याकडे तपास होता तो वादात अडकला होता. म्हणून क्राइम बँचच्या शिवाजी ठाकरेकडे तपास दिला होता.