आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका ऑटोची दोघांना विक्री; चालकाचेे "उल्लू बनाविंग'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एका ऑटोची मूळ कागदपत्रे आणि त्यांच्या दुय्यम प्रतच्या आधारे दोघा जणांना विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार मोहन ओंकार मानकर (रा. बालाजीनगर) यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात केली.

मानकर यांनी तक्रारीत म्हटले, गोडबोले प्लॉटमधील महाराणा प्रताप चौकात राहणाऱ्या एका व्यक्तीजवळून त्याचा एमएच ३० एए ५२०३ या क्रमांकाचा ऑटो लाख २१ हजार रुपयांना विकत घेतला. १८ ऑक्टोबर २०१३ ला संबंधित ऑटो मालकाला खरेदीचे सर्व पैसे देऊन विक्री करारनामा आणि त्याची नोटरीसुद्धा करून घेतली. ऑटोच्या पूर्वीच्या मालकाने ऑटोचे सर्व वैध मूळ दस्तऐवज, ऑटो ताब्यात दिला. त्यानंतर तो २० ऑक्टोबरला आपल्याकडे आला आणि ऑटोचे परमीट ट्रान्सफर होणे बाकी असल्याची बतावणी करून तो काही दिवस भाड्याने चालवण्यास देण्याची विनंती केली. त्याच्यावर विश्वास ठेवून आपण तो त्याला भाड्याने दिलाही. पण, काही दिवसांनंतर ऑटो परत घ्यायला गेलो असता त्याने ऑटो आपल्याकडे नसल्याचे सांगितले.

याबाबत शंका आल्याने आपण प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन चौकशी केली असता संबंधित व्यक्तींनी ऑटोच्या कागदपत्रांच्या दुय्यम प्रत काढून तो ऑटो परस्परच दुसऱ्या व्यक्तीला विकल्याची माहिती समोर आली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...