आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑटो वाहतुकीला लगाम, अवैध प्रवासी वाहनांवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गजबजलेलेरस्ते विस्कळीत वाहतूक, असे चित्र बदलण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने घेतला आहे. ऑटोचालकांना गणवेश सक्तीचा करण्यात आला असून, कुठेही ऑटो उभा केल्यास दंड ठोठावण्याची मोहीम पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
केवळ २८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेल्या अकोला शहरात वाहतूक व्यवस्था कोलमडलेली आहे. सिग्नल बंद, पार्किंगच्या जागी लघू व्यावसायिक, बेलगाम ऑटोंची वाहतूक या सर्व प्रकारामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. या प्रकाराकडे पोलिस प्रशासनाने आतापर्यंत दुर्लक्ष केले होते, परंतु आता पोलिस प्रशासनही सरसावले आहे. ऑटोचालकांना आता वाहन चालवण्याचा परवाना सोबत ठेवावा लागणार असून, गणवेशातच ऑटो चालवावा लागणार आहे. तसेच ऑटोचालकाला त्याच्या बाजूला प्रवासी बसवण्यास मनाई करण्यात आली आहे, तर कुठेही ऑटो उभा केल्यास दंड ठोठावला जाणार आहे. यापुढे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध खासगी वाहनाद्वारे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
एकीकडे ऑटोचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतानाच दुसरीकडे बेफाम वेग कर्कश आवाज करून दुचाकी चालवणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. यापुढे ट्रिपलसिट फॅन्सी नंबरप्लेट, पार्किंग नसलेल्या ठिकाणी वाहन उभे करणे आदींवर कारवाई केली जाणार आहे. प्रशासनाने टोइंग मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेलाही गती दिली जाणार आहे. याचसोबत जड वाहनांच्या प्रवेश मनाईच्या वेळेस जड वाहन शहराच्या रस्त्यावर आणणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याचा इशाराही पोलिस प्रशासनाने दिला आहे.
दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे तसेच पिवळ्या पट्ट्याच्या आत आपले वाहन उभे करावे, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक एस.एस.ठाकूर यांनी केले आहे. पकडण्यात आलेली अवैध प्रवासी वाहने.
बसस्थानकावर मोहीम राबवणे गरजेचे
बसस्थानकाच्यापरिसरामध्ये होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीवर झालेल्या कारवाईनंतर आता बसस्थानकात प्रवाशांना हायजॅक करणाऱ्या खासगी वाहनधारकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच ही मोहीम नियमित सुरू रहावी. मंगळवारी झालेल्या कारवाईचे पोलिस अधीक्षक मीणा यांचे आभार व्यक्त करतो.'' अनंतशेंडे, आगारव्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक