आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला शहरात लुटीचे ऑटो‘मीटर’ सुसाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरात सध्या मीटर शिवाय ऑटोरिक्षा धावत आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष व ऑटोरिक्षा चालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना बसत आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारण्यात येत नसल्याने प्रवाशांचा खिसा रिकामा होत आहे. मीटरप्रमाणे भाडे आकारल्यास प्रवाशांचे सरासरी 20 टक्के भाडे वाचू शकते. तसेच सुरक्षित प्रवासही होऊ शकतो. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या लेखी अकोला शहरात दोन हजार 196 ऑटोरिक्षा आहेत. नोंदणीच्या वेळी (पासिंग करताना) ऑटोरिक्षांना मीटर असे; मात्र प्रवाशांची वाहतूक करताना मीटर काढल्या जाते, मनाने दर आकारल्या जातो. ऑटोचालकांकडून होणारी ही लूट थांबवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

अशी होते लूट..
मदनलाल धिंग्रा चौक ते आर्शयनगर (डाबकी रोड) हे अंतर 3.3 कि.मी आहे. ऑटोचालक 6 किंवा 7 प्रवाशांची वाहतूक करतात. चालक या प्रत्येक प्रवाशाकडून 10 रुपये भाडे घेतो. त्यानुसार चालकाला 60 ते 70 रुपये मिळतात; मात्र मीटरने भाडे आकारल्यास चालकाला केवळ 28 रुपये 40 पैसे मिळतील.

रुग्णांनाही बसतो फटका
विना मिटर ऑटोरिक्षा धावण्याचा सर्वाधिक फटका रुग्णांना बसतो. 3.30 ते 4 कि.मी. असलेल्या अंतरासाठी ‘स्पेशल’च्या नावाखाली 50 ते 60 रुपये आकारण्यात येतात. रुग्णांना नाईलाजास्तव ऑटेरिक्षा चालकांना अव्वाच्या सव्वा भाडे द्यावे लागते.

बाहेरील प्रवाशांची लुबाडणूक
अकोल्यात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे शहरात बाहेरील जिल्ह्यातून येणार्‍यांची संख्या कमी नाही. अनेक वेळा रात्रीही प्रवासी अकोल्यात उतरतात. ते अकोल्यातील ठिकाणांबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे 2 ते 3 कि.मी. अंतर असलेल्या ठिकाणी सोडण्यासाठी ऑटोरिक्षा चालक 30 ते 40 रुपये भाडे आकारतात. ऑटोरिक्षांना मिटर बसविल्यास बाहेरील प्रवाशांची लुबाडणूक होणार नाही.


मीटरप्रमाणे भाड्याचे दर
0पहिल्या 1 कि.मी.साठी 10 रुपये
0नंतरच्या प्रत्येक कि.मी. साठी 8 रुपये