आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Awareness For Water News In Marathi, Divya Marathi

सुजल निर्मल संकल्पपूर्ती जनजागृती आजपासून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्त्व पटवण्यासाठी सुजल-निर्मल संकल्पपूर्ती जनजागृती सप्ताह राबवला जात आहे. याअंतर्गत गृहभेटी, विशेष बैठका, प्रभात फेरी आदी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग व केंद्राच्या निर्देशानुसार सुजल-निर्मल संकल्पपूर्ती जनजागृती सप्ताहाचे 20 ते 25 फेब्रुवारीदरम्यान आयोजन केले आहे. 2013-14 मधील निर्मल भारत अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. या सप्ताहात शौचालयाची बांधणी ,नियमित वापर, बालकांच्या विष्ठेची विल्हेवाट, साबणाने हात स्वच्छ करणे, पाण्याची साठवण, हाताळणी, टीसीएल पावडरचा वापर करणे, शोषखड्डय़ाच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन करणे आदी संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणार आहेत.

सर्वांचा सहभाग महत्त्वाचा
सामाजिक जाणिवेतून राबवण्यात येणार्‍या सुजल-निर्मल संकल्पपूर्ती जनजागृती सप्ताहात प्रत्येकाने सहभागी व्हावे. अरुण उन्हाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला.

जिल्हास्तरीय कार्यशाळा 26 रोजी
सुजल-निर्मल संकल्पपूर्ती जनजागृती सप्ताहामध्ये 26 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोला येथे आबासाहेब खेडकर सभागृह येथे सकाळी 11 वाजता आयोजित केली आहे. कार्यशाळेस सर्व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, 2013-14 मधील निर्मल भारत अभियान आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेमध्ये समाविष्ट ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक तसेच विस्तार अधिकारी, पंचायत विभाग, आरोग्य, शिक्षण व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

विविध कार्यक्रमांचा समावेश
सप्ताहात जिल्हा, तालुकास्तरीय कार्यशाळा विशेष सभांचे आयोजन, प्रभात फेरी, शाळांमधील उपक्रम, आशा अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रबोधन, स्रोतांवर पेंटिंग करणे, पाणी व स्वच्छतेविषयी गृहभेटी समूह बैठका यांसारखे उपक्रम राबवणार आहेत.