आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवासस्थाने की खुराडे, पोलिस निवासस्थानांच्या समस्येकडे गृह विभागाने आता तरी लक्ष द्यावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महाराष्ट्र पोलिसांच्या निवासाकडे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. आजच्या युगात पोलिसांना १० बाय १५च्या खोलीमध्ये राहावे लागते, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे. हे वास्तव "दिव्य मराठी'ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. नेहमी दुसऱ्यासाठी राबणाऱ्या पोलिसांना साधी राहण्याची व्यवस्था नाही. शिस्तीचा मोठा बडगा असल्यामुळे कुणी पुढे येऊन बोलायची सोय नाही. ही विदारक परिस्थिती लक्षात घेता, मुख्यमंत्री साहेब पोलिसाच्या निवासस्थानी भेट द्याच, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्याला बदलीच्या ठिकाणी राहण्यासाठी निवासस्थान उपलब्ध करून देणे, हा त्यांचा अधिकार आहे. त्यानुसार प्रत्येक खाते त्यांच्या कर्मचाऱ्यांची काळजी घेते आणि त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे कसोशीने लक्ष देते. मात्र, पोलिस खाते त्याला अपवाद आहे. आजपर्यंत पोलिस पैसे खातात, हे जसे सर्वांना माहीत आहे. मात्र, तो कुठे राहतो, कसा राहतो, ही दुसरी बाजू अजून तरी समोर आली नाही. अकोला जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे. पोलिसांच्या निवासस्थानांची पुरती वाट लागली आहे. पोलिस, हेडकॉन्स्टेबल, एएसआय, पीएसआय आणि पोलिस निरीक्षक यांची निवासस्थाने म्हणजे खुराडे झाली आहेत.
शहरातील अनिकट येथे पोलिसांची निवासस्थाने आहेत. तेथे पाहणी केली असता पोलिसांना केवळ १० बाय १५ची एक खोली आहे. त्याच खोलीमध्ये स्वयंपाक आणि तेथेच राहणे, समोर फुटक्या-तुटक्या कौलाची ओसरी आहे, अशा निवासस्थानांमध्ये पोलिसांना राहावे लागत आहे, तर हेडकॉन्स्टेबल यांच्या निवासस्थानामध्ये एक खोली आणि दुसरी कौले तुटलेली खोलीत संसार थाटले आहेत. याकडे गृहविभागाचे दुर्लक्ष असून, त्यात कधी सुधारणा होईल आणि त्यात सुधारणा होईल काय, असा प्रश्न "अच्छे दिन'ची बिरुदावली लावणाऱ्या सरकारला पोलिस विचारत आहेत.
‘कोणताही पाहुणा येत नाही’
आमचेघर पाहून आमच्याकडे पाहुणे येत नाही. आले तर मुक्काम करत नाहीत, अशी अवस्था आहे. आम्हालाही लाज वाटते. पण, काय करणार. बाहेर सहा, सात हजार रुपये घरभाडे आहे, नाही परवडत. तक्रार करता येत नाही, असे एका पोलिस कर्मचाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कटनीच्या निर्णयाने पोलिस परेशान...अनिकट पोलिस वसाहतीची झोपडपट्टीसारखीच झाली गत...