आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटू अनुभवातही आनंदाचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- बसमध्ये पाय ठेवायला जागा नाही आणि रेल्वेच्या आरक्षित डब्यात प्रवास करता येत नाही, अशा कटू आठवणीत आनंदाच्या प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे. लहान मुलांच्या शाळांना सुटी लागली असून, घरची दिवाळी झाल्यानंतर नातेवाईकांच्या गावाचा रस्ता मुलांनी आणि पालकांनी धरला आहे.

परिवर्तन बसमध्ये तर उभे राहण्यासाठीही जागा नाही. रेल्वे स्टेशनवर मोजक्याच गाड्या असल्याने आरक्षित डब्यात सर्रास प्रवास होत आहे. पॅसेंजरमधील प्रवासात तर अनेक समस्या आहेत. नागपूर ते भुसावळ जाणार्‍यांमध्ये सर्व रेल्वे गाड्यांमध्ये शेगावला थांबणारे अनेक प्रवासी आहेत. शेगावला पुणे आणि मुंबईतून अनेक भाविक येतात. प्रवासात महत्त्वाच्या पाण्याची सोय ठिकाणी नाही. रेल्वेस्थानक आणि बसस्थानक स्वच्छ नाही, तशी काय ती अवस्था रेल्वेची आणि बसची आहे. मात्र, त्या समस्या नसून, आनंदाच्या मार्गातील अडथळा समजत दिवाळीच्या आनंदाचा मार्ग सुरू झाला आहे. शाळा सुरू झाल्यानंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक एन्जॉय करण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

शाळांची सुटी लागल्यानंतर बस आणि रेल्वेस्थानकावर गर्दीच गर्दीचे चित्र आहे. अकोल्यातून जसे बाहेर जाणारे आहेत, तसे पुणे आणि मुंबईत नोकरी करणारे येथे धाव घेत आहेत.

दुसर्‍यांनी दिलेले खाणे टाळा
रेल्वेत प्रवास करताना अनोळखी व्यक्तींनी दिलेले बिस्किट किंवा गुंगीचे औषध लावलेले चॉकलेट खाण्यापासून मुलांना परावृत्त करा. मौल्यवान वस्तू असलेल्या बॅग साखळींनी लॉक करा. प्रवासात बाहेरच्या उघड्यावरील वस्तू खाण्यापेक्षा आरोग्यासाठी पॅकेजफूड खा, ज्यावर अंतिम वापराची मुदत पाहूनच ते खरेदी करा. दिवाळीचा आनंद वाढवण्यासाठीचा हा प्रवास आहे, प्रवासात वाद टाळा.

काळजी घ्या; आनंद वाढवा
विशेषत: लहान मुलांचे खिडकी, गाड्यांचे दरवाजे यांच्यात हात जाणार नाही, यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे. लहान मुलांचे प्रवास सुरक्षित होण्यासाठी घरचे स्वच्छ पिण्याचे पाणी आणि खाण्याचे सामान सोबत घ्या. आरोग्यासाठी मुलांचे प्रथम उपचाराचे औषध सोबत घ्या. प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. मोबाइल, चार्जर सोबत घेण्यास प्रवासात विसरू नका, गाड्यांची व घरची चावी न विसरता घ्या.