आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thackeray Jubilee Cup Started, Aimed State

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेला तापडियानगरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर 20 जानेवारीला प्रारंभ झाला.

स्पध्रेचे उद्घाटन आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख र्शीरंग पिंजरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अँड. अनिल काळे, जिल्हा संघटिका ज्योत्स्ना चोरे, चंद्रशेखर पांडे, राजेश मिर्शा, हरिभाऊ भालतिलक, कृपाशंकर मिर्शा, तालुकाप्रमुख मुकेश मुरुमकार, धनंजय गावंडे, डॉ. विनीत हिंगणकर, दीपक गोयनका, विष्णू बुले, योगेश नावकार, रवी पाटील आदी उपस्थित होते. शिवसेना शहरप्रमुख तरुण बगेरे यांनी आयोजित केलेल्या या स्पध्रेत राज्यभरातील नामांकित सहभागी झाले आहेत. प्रथम क्रमांक मिळवणार्‍या संघाला एक लाख, द्वितीय क्रमांकास 31 हजार व तृतीय क्रमांक मिळवणार्‍या संघाला 15 हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. 2 फेब्रुवारीला स्पध्रेचा समारोप होणार आहे. पंच म्हणून विजय मेर्शाम, बबलू शुक्ला, किरण ठाकूर, योगेश अग्रवाल, पवन बगेरे, विशाल शिंदे, डॉ. मनोज शर्मा काम पाहत आहेत.