आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक, रेल्वेत जुलैनंतर पडणार नोकऱ्यांचा पाऊस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - नोकरीच्या संधीची वाट पाहणा-या तरुणांसाठी खुशखबर.. येत्या जुलैैनंतर शासनाच्या विविध विभागांमध्ये रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यात सर्वाधिक संधी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकिंग सेक्टरमध्ये आहेत. एसएससीत हजार ५७८ जागा : एसएससीच्या वतीने नुकतेच हजार ५७८ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले. ज्यांचे वय २७ वर्षे शिक्षण बारावी उत्तीर्ण आहे, अशांनी १३ जुलैपर्यंत अर्ज भरायचे आहेत. गोविंद वल्लभ पंत कृषी प्रौद्योगिकी विभागात १०६ असिस्टंट प्रोफेसर पदांसाठी आणि ७० असिस्टंट अकाउंटंट पदासाठी अर्ज मागवले आहेत.

टपाल खाते
पोस्टल असिस्टंटच्या हजार ५७८ जागा स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून भरण्यात येणार आहेत.
प्रसार भारती : न्यूज कंटेट एक्झिक्युटिव्ह पदासाठी जागा निघाल्या आहेत. ३० जूनपर्यंत उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. एकूण २३ जागांसाठी ही भरती होणार आहे.
भारतसंचार निगम
पीजीएम आणि जीएम पदांसाठी भरती होणार आहे. अर्जाची शेवटची तारीख १५ जुलै आहे.
नॉर्थ ईस्टर्न रेल्वे
पॉवर ग्रीड कॉर्प.
आरोग्य विभाग
रुरल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि रिसर्च विभागात नर्सिंग ऑफिसर आणि स्टाफ नर्सची १५१ पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख जुलै आहे. तसेच मेडिकल ऑफिसरच्या ७६१ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

आरबीआय
भारतीय रिझर्व्ह बॅँकेत ५०४ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १८ ते २८ वयोगटातील पदवीधर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची तारीख ३० जुलै असून परीक्षा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होणार आहे. तसेच राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रोबेशनरी आॅफिसर पदासाठी २० हजार जागांसाठी भरती केली जाणार आहे.

नॉर्थ ईस्टर्न रेल्वे विभागात १९३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. हे ऑनलाइन भरायचे आहेत.पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन विभागात ट्रेनी इंजिनिअर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी २७ जूनपर्यंत अर्ज करता येतील.
बातम्या आणखी आहेत...