आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक कर्मचार्‍यांचा संप- कोट्यवधींची उलाढाल ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- बँक कराष्ट्रीयीकृतर्मचार्‍यांचा सोमवार, 10 फे ब्रुवारीपासून दोन दिवसांचा संप सुरू झाला आहे. या संपामुळे शहरातील सुमारे 500 कोटींची उलाढाल ठप्प झाली. संपकर्त्या बँक कर्मचार्‍यांनी गांधी मार्गावर सकाळी निदर्शने करून केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली.
वेतनवाढीसह वेगवेगळय़ा मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांतील कर्मचार्‍यांनी हा संप पुकारला़ रविवारला जोडून सलग दोन दिवस संप होत असल्याने आर्थिक व्यवहार थंडावले आहेत़ देशव्यापी संपाचा परिणाम शहरातील अर्थव्यवस्थेवर पडला. अनेक वर्षांपासून बँक कर्मचारी संघटनांचा वेतनवाढ, खासगीकरण आदी मुद्दय़ांवर केंद्र सरकारशी संघर्ष सुरू आहे. या संघर्षावर सरकार, वित्त मंत्रालय कोणताही तोडगा काढत नसल्याने 18 डिसेंबरनंतर आता पुन्हा बँक कर्मचारी संघटनांनी संप केला. या संपाचा फटका उद्योजक, व्यापार्‍यांसह सर्वसामान्यांना बसला. यामुळे बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाल्याने सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आजपासून सुरू झालेल्या संपात अकोला जिल्ह्यातून दीड हजारांवर अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल कन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन या कर्मचारी संघटना संपात सहभागी झाल्या़ अधिकारी वर्गातून ऑल इंडिया बँक ऑफिसर्स ऑर्गनायझेशन, ऑल इंडिया बँक कन्फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांसह विविध संघटना संपात सहभागी झाल्या. बँक कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊ न युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या छत्राखाली संप पुकारला आह़े गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेपुढे सोमवारी सकाळी 11 वाजता श्याम माईनकर, दिलीप पिटके, यशवंत आंबेकर, र्शीहरी गिते, उपासने, गजानन पवार, सुधीर देशपांडे, अनिल पानझाडे, अभय कुळकर्णी, दाते, पातुरकर, रिधोरकर, काळे, बैस आदी पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.
ऑर्गनायझेशन, ऑल इंडिया बँक कन्फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांसह विविध संघटना संपात सहभागी झाल्या. बँक कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊ न युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या छत्राखाली संप पुकारला आह़े शहरातील गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेपुढे सोमवारी सकाळी 11 वाजता श्याम माईनकर, दिलीप पिटके, यशवंत आंबेकर, र्शीहरी गिते, उपासने, गजानन पवार, सुधीर देशपांडे, अनिल पानझाडे, अभय कुळकर्णी, दाते, पातुरकर, रिधोरकर, काळे, बैस आदी पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले.