आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीक कर्ज फसवणूक प्रकरणी बँकेचा व्यवस्थापक, कर्जदार अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - पीक कर्ज फसवणूक प्रकरणात पोलिसांनी देना बँकेचा तत्कालीन व्यवस्थापक रवींद्र गुन्नाडे आणि कर्जदार सतीश सहदेव गुव्हाळे यांना 12 ऑगस्ट रोजी अटक केली. या दोघांची तीन दिवसांकरिता पोलिस कोठडीत रवानगी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. देना बँकेमार्फत वितरण करण्यात आलेल्या पीक कर्जामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची तहसील कार्यालयाने चौकशी केली. अधिकारी व कर्जदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

अफरातफरी भोवली ?
कर्ज मंजूर करताना कागदपत्रांची चौकशी करण्यात आली नाही. बनावट 7/12, 8 अ, फेरफार तयार करण्यात आले. या दस्तावेजांवर खोटे शिक्के मारण्यात आले. प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण करून या कागदपत्रांची पडताळणीची जबाबदारी बँकेच्या अधिकार्‍यांची होती. मात्र, बनावट कर्जाच्या आधारे कर्ज वितरित करण्याची बाब उजेडात आली. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक गुन्नाडेच्या अटकेनंतर कोणत्या अधिकार्‍यांनी बनावट कागदपत्रांकडे दुर्लक्ष केले की, तेच या अफरातफरीत सहभागी होते, याची उत्तरे पोलिस शोधणार आहेत.


अधिकार्‍यांना मिळाल्या भेट वस्तू
पीककर्ज फसवणूक प्रकरणात दलाल सहभागी झाले होते. बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मंजूर करण्यासाठी दलालांनी बँकेच्या अधिकार्‍यांना वॉशिंग मशीनसारख्या भेट वस्तू दिल्या. पोलिस तपासात भेट वस्तू घेणार्‍या अधिकार्‍यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.