आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँक आॅफ बडोदाच्या व्यवस्थापकांना घेराव; स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिले अधिकार्‍यांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अर्ज घ्या, कर्ज द्या, आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांतर्गत गारपीटग्रस्तांना मिळणारी आर्थिक मदत बँकांनी पीक कर्ज खात्यात जमा करू नये, शेतीशी निगडित कर्जाची सक्तीने वसुली करू नये, आदी मागण्या राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापनाकडे करण्यात येत आहेत.

आज 23 जून रोजी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष कैलास फाटे व युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात बँक आॅफ बडोदाचे व्यवस्थापक हरीश शर्मा यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष राजू नाकाडे, श्रीकृष्ण काकडे, आनंदा आटोळे, शे. युनूसभाई यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बडोदा बँकेच्या व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामात घेतलेल्या पीक कर्जाचे व्याज माफ केले आहे. तेव्हा, शेतकर्‍या कडून ते वसूल केले जाऊ नये. गारपीटग्रस्तांना मिळणारी शासकीय मदत त्यांच्या बचत खात्यात बँकेने त्वरित जमा करावी. मदतीच्या रकमेतून शेतकर्‍या चे शेती निगडीत कर्ज वसूल केले जाऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.
आंदोलन तीव्र करणार
४शेतकर्‍याच्या मागण्यांबाबत आज आम्ही बडोदा बँकेला निवेदन दिले आहे. बँक व्यवस्थापनाने त्यावर त्वरित विचार न केल्यास लोकशाही मार्गाने शेतकर्‍या ना सोबत घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन अधिक तीव्र करेल.

श्याम अवथळे, जिल्हाध्यक्ष युवा आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, खामगाव
शेतकर्‍याच्या मागण्या वरिष्ठांना कळवणार ४शेतकर्‍या नी आज निवेदनाद्वारे केलेल्या मागण्या योग्य आहेत. याबाबत आम्ही वरिष्ठ अधिकार्‍या ना कळवणार आहोत. तसेच, सद्य:स्थितीत बँकेकडून नियमित शेतकर्‍या ना पीक कर्जाचे वितरण करण्यात येत आहे. पीक कर्जाच्या पुनर्गठनासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍याच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- हरीश शर्मा, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ बडोदा, खामगाव