आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक घोटाळा : ‘कोट्यवधीं’ची फिरवा-फिरवी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेतील 64 कोटींच्या घोटाळ्यात दोन फर्मच्या नावे 16 कोटी 73 लाख 67 हजारांची फिरवाफिरवी केल्याचे उजेडात आली आहे. पोलिस या कोट्यवधी रुपयांच्या ‘लाभार्थ्यां’चा शोध घेत आहेत.

घोटाळ्याप्रकरणी 10 ऑक्टोबरला बँकेने दुसर्‍या टप्प्यात 17 जणांविरुद्ध तक्रारी दिल्या. पोलिसांनी तपासादरम्यान अधिकारी, कर्मचारी आणि लेखा परीक्षकांचे जबाब नोंदवले ,लेखा परीक्षण अहवाल, स्टेटमेंट आणि व्हाऊचरची तपासणी केली. या तपासणीत बँक अधिकार्‍यांचा भ्रष्ट , गलथान कारभार चव्हाट्यावर येत आहे.

असे केले कोटी-कोटी नावे
बँकेच्या घोटाळ्यात दोन फर्मच्या नावे कोट्यवधी रुपये दाखवले. रामचंद्र रामगोपाल या फर्मच्या नावे 29 नोव्हेंबर 1999 ला एक कोटी, 31 मार्चला 74 लाख, 3 एप्रिलला दीड कोटी, 8 जून 2000 मध्ये 50 लाख, 22 जून रोजी दोन कोटी 22 लाख, 25 ऑक्टोबरला एक कोटी 25 लाख, 13 नोव्हेंबरला दोन कोटी, 26 फेब्रुवारी 2001 रोजी 50 लाख, 27 फेब्रुवारीला 35 लाख, 31 मार्चला दोन कोटी 36 लाख 50 हजार आणि 12 एप्रिलला 60 लाख नावे दाखवले . कोठारी ब्रदर्समध्ये 8 जून 2000 रोजी 50 लाख, 27 मे ला तीन कोटी 20 लाख , 18 जून 2002 रोजी एक कोटी एक लाख आठ हजार नावे दाखवले आहे.


असा झाला घोटाळा
र्मयादा 25 लाखांची, दिले तीन कोटी 75 लाख : घोटाळ्यात संचालक मंडळाचे आदेश धाब्यावर बसवले. कोठारी कर्मशियल कॉम्प्लेक्स फर्मची क्रेडिटची र्मयादा 25 लाखांवरून तीन कोटी 75 लाखांपर्यंत वाढवली. संचालक मंडळाने कॅश क्रेडिटची र्मयादा 25 लाखांपर्यंत वाढीला मंजुरी दिली होती.

भागीदार 12, स्वाक्षर्‍या दोघांच्या : दि अकोला अर्बन को-ऑप. बँकेमध्ये नवलजी कॉटस्पिन लिमिटेडने खाते उघडले. या फर्ममध्ये 12 भागीदार आहेत. मात्र, या बॅंकेमध्ये फर्मचे खाते उघडताना आवश्यक असलेल्या फॅार्मवर फर्मच्या केवळ दोनच भागीदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत, असे आढळले आहे.