आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीककर्ज फसवणूक प्रकरण : बँक अधिकार्‍यांवर पोलिसांची नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बनावट दस्तावेजांच्या आधारे पीककर्ज घेऊन सिंडीकेट बँकेच्या फसवणूकप्रकरणी बँकेचे दोन अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत. यामध्ये हे अधिकारीही लाभार्थी असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दामले चौकातील सिंडीकेट बँकेत नऊ शेतकर्‍यांनी 2005 ते 2009 या कालावधीत पीक कर्जासाठी अर्ज केले होते. मात्र, बनावट दस्तावेजांच्या आधारे कर्ज घेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी 14 लाख 39 हजार रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी शनिवारी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी आठ कर्जदारांना अटक केली असून, सध्या हे आरोपी पोलिस कोठडीत आहेत. कर्जदारांची झोळी रिकामी

या प्रकरणात बँकेचे अधिकारी आणि एजंटांचा सहभाग असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. मात्र, या प्रकरणात एजंटऐवजी अधिकारीच ‘लाथार्भी’ झाले. अर्जदाराकडून मंजूर कर्ज रकमेची 50 टक्के रक्कम अधिकार्‍यांना देण्यात येत होती. पोलिस या ‘लाभार्थ्यांचा’ शोध घेत असून, या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता आहे.