आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक घोटाळा : कोट्यवधींची खाती लपवली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात माहिती तंत्रज्ञानाचा गैरवापर करत जवळपास 16 कोटी सात लाखांची खाती संगणकाद्वारे लपवली होती. त्यामुळे पोलिस आता या घोटाळ्यातील इतर लाभार्थ्यांचा शोध घेत आहेत.

अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅँक फसवणूकप्रकरणी 4 जुलैला शहर कोतवाली पोलिस ठाण्यात व्यापारी नंदलाल उर्फ नंदकिशोर नवलकिशोर कोठारी, जुगलकिशोर नवलकिशोर कोठरी, संतोष नवलकिशोर कोठारी, प्रशांत राठी, रवींद्र श्रीकृष्णजी कचोलिया, बँकेचे निलंबित मुख्य कार्यकारी अधिकारी (सर व्यवस्थापक) ओमप्रकाश तुळशीराम राठी, कर्ज व्यवस्थापक के. के. प्रसाद यांच्याविरुद्ध भादंविचे कलम 420, 409, 467, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी संबंधीत भागीदार आणि तत्कालीन बँक अधिकार्‍यांना जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले आहे. या जबाबानंतर पोलिस पुढील दिशा निश्चित करतील.