आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेला प्रतीक्षा कर्ज पुनर्गठन आदेशाची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - गारपीट,अतिवृष्टी यामुळे पिके उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कर्जाचे पुनर्गठणाचे आदेश दिले असले तरी ते शेतकऱ्यांना किंवा बँकेला लाभदायी ठरतील, याची शक्यता धूसर आहे. जिल्ह्यातील शेतक-यांची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राज्य शासनाकडे कर्जपुनर्गठणासाठी मागणी केली असली तरी अद्याप यावर कोणताच निर्णय झालेला नाही.

अकोला वाशीम जिल्ह्यात मिळून ८३५ विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप केले जाते. यातील सुमारे ४०० संस्था या वाशीम जिल्ह्यातील आहेत. मागील वर्षभरात गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे जिल्ह्यातील शेकडो एकरावरील पिकांचे प्रचंड नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका शेतक-यांना सहन करावा लागला होता. प्रशासकीय पातळीवर पंचनाम्यांबाबत अनेक ठिकाणाहून तक्रारीही आल्या होत्या. अशातच शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने पंचनाम्यानुसार कर्जपुनर्गठण करण्याचे आदेश दिले आहेत. यातील तरतुदी मात्र शेतक-यांना दिलासा देण्यासारख्या नाहीत.
लाभासाठीअट ठरतेय आडकाठी
जितक्याक्षेत्राचा पंचनामा झाला आहे, त्याच क्षेत्राकरिता कर्जपुनर्गठण करण्याचे आदेश
आहेत. यामुळे जर एखाद्या शेतकऱ्यांचे दहा एकरवरील द्राक्ष पिकाचे नुकसान झालेले असेल आणि दोनच एकराचा पंचनामा झालेला असेल तर उर्वरित आठ एकराकरिता घेतलेले कर्ज अगोदर फेडावे लागणार असून, त्यानंतर दोन एकरासाठी कर्जपुनर्गठणाचा फायदा घेता येणार आहे. यामुळे शेतकरी या योजनेतून समाधानी नाहीत. दुसरीकडे पुनर्गठण केले तरी ३१ मार्च २०१६ पर्यंत कर्जाचा भरणा करावाच लागणार असल्याने बँकेची थकबाकी वाढण्याची शक्यता वाढली आहे.

जून संपला तरीही पीक कर्जवाटप स्थिती वाईट
शेतक-यांनापीक कर्जाच्या वाटपासंदर्भात देण्यात आलेले उद्दिष्ट बँकांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात पाऊसमान चांगले असल्याने पेरण्या सुरू झालेल्या आहेत. अशा स्थितीत बँकांनी शेतक-यांना सहकार्य केल्यास निधीची उपलब्धता तातडीने होणे शक्य आहे. मात्र, जून महिना संपत आला तरीही पीक कर्जाच्या वाटपाची स्थिती अत्यंत वाईट आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे सोय नाही. त्यामुळे बँकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. '' चंद्रकांतठाकरे , कृषीपशुसंवर्धन सभापती
बातम्या आणखी आहेत...