आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bar Association Posed To A Panel Dominated By The Mohata

बार असोसिएशनवर मोहता यांच्या पॅनेलचे वर्चस्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-अकोला बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवारी 24 जानेवारीला झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अँड. एस. जी. गवई निवडून आले आहेत. त्यांनी अँड. व्ही. पी. जाधव यांचा 157 मतांनी पराभव केला.
अकोला बार असोसिएशनच्या निवडणुकीत 943 पैकी 775 सदस्यांनी मतदानाचा अधिकार बजावला. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र बार कौंसिलचे माजी अध्यक्ष अँड. मोतीसिंग मोहता यांचे पॅनेल आणि अँड. बी. के. गांधी यांच्या पॅनेलमध्ये लढत झाली. या वेळी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अँड. मोहता यांच्या गटाचे अँड. एस. जी. गवई हे 465 मते घेऊन विजयी झाले. या निवडणुकीत अँड. गांधी यांच्या गटाचे अँड. व्ही. पी. जाधव यांना 308 मते मिळाली. बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अँड. आनंद गोदे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची या पदावर बिनविरोध निवड झाली. या वेळी बार असोसिएशनच्या सचिवपदासाठी मतदान घेण्यात आले.
त्यामध्ये अँड. हेमंत मोहता यांचा विजय झाला. त्यांना 431 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले अँड. आर. एन. इस्तापे यांना 273, अँड. जी. आर. परिचाल यांना 36 आणि अँड. आर. एन. वानखडे यांना 30 मते मिळाली. या निवडणुकीमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिवपदी अँड. मोतीसिंग मोहता यांच्या गटाचा विजय झाला. दुपारी 4 वाजता या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड. यू. पी. नाईक यांनी काम पाहिले.