आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटाट्याच्या झाडाला टोमॅटो! चार-पाच झाडांना लागली फळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जानेफळ - बदल हा जगाचा नियम आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे अवर्षण, अतिवृष्टीसह गारपीट असे एक ना अनेक प्रकार समोर येत आहेत. यात पिकेही मागे राहलेली नाहीत. जानेफळमधील शेतकरी भास्कर बापूअण्णा दाभाडे यांच्या शेतातील बटाट्यांच्या काही झाडांना चक्क टोमॅटो लागल्याची आश्चर्यजनक प्रकार उघडकीस आला आहे. निसर्गाची ही करणी पाहण्यासाठी जानेफळमधील शेतक-याच्या शेतावर घरी नागरिकांनी गर्दी केली आहे.
दाभाडे यांनी त्यांच्या शेतामध्ये दीड एकर भागात बटाट्याचे पीक घेतले आहे. दोन महिन्यापूर्वी त्यांनी त्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली होती. सात फेब्रुवारीला ते त्यांचा मुलगा अमोल, जावाई यांच्यासह शेतावर सहज फेरफटका मारण्यासाठी गेले असता, त्यांना शेतातील चार ते पाच झाडाला टोमॅटो लागल्याचे निदर्शनास आले. कुतुहल म्हणून त्यांनी त्यातील एक झाड उपटले असता, बटाट्याच्या झाडाला वर चक्क टोमॅटो आले तर खाली बटाटे आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. झाडाला आलेले फळ त्यांनी फोडून पाहले असता त्यात टोमॅटोसारखे बी होते. त्याची चवही टोमॅटोसारखीच लागली.

हा म्युटेशनचा प्रकार
जैविकघटकांच्या सातत्यपूर्ण साखळीत अचानक झालेल्या बदलातून निर्माण होणारा एखादा नवीन जैविक घटक म्हणजेच म्युटेशन होय. म्युटेशनची ही प्रक्रिया नैसर्गिक आहे. निसर्गातील बदल, वातावरण, संबंधित ठिकाणी घेण्यात आलेली पूर्वीची पिके, हवामान जमिनीतील ऑर्गन यामुळे कधी कधी पिकांच्या डीएनएमध्ये बदल होऊन असा प्रकार घडतो. परिसरातील स्थितीमुळे कोट्यवधी रोपट्यांपैकी एखाद्यातच असा बदल घडू शकतो. हा बदल आपण टाळू शकत नाही.
डॉ.सय्यद हुसैन, कृषी विभाग, बुलडाणा