आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान, आपल्या शहरात असू शकतात 'छुपे' कॅमेरे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना गोव्यातील ‘फॅब इंडिया’च्या चेंजिंग रूममध्ये छुपा कॅमेरा आढळून आला. मात्र, ही भीती केवळ मेट्रो आणि कॉस्मोपॉलिटिन शहरातच आहे, असे नाही; तर तालुका आणि जिल्हा ठिकाणीही हा धोका आहे. त्यामुळे महिलांनी काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

मागील काही वर्षांपासून महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली आहे. दरम्यान,अश्लील चित्रफिती पाहणाऱ्या आंबट शौकिनांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे या चित्रफितींच्या बाजारातून आंतरराष्ट्रीय स्तरावर राेज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. इंटरनेटच्या माध्यमातून त्याचे रॅकेट गावखेड्यापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अनोळखी ठिकाणी महिलांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

स्वस्तात उपलब्ध होतात कॅमेरे
सद्य:स्थितीतटीव्ही, इंटरनेट यावर छाेट्या छुप्या कॅमेऱ्यांच्या जाहिरातीचा भडीमार होत असून, अत्यंत स्वत:च घर बसल्या ग्राहक त्यांना खरेदी करू शकतात. पेनचे टोपण, शर्टचे बटन, दरवाजाची कडी यावर सहजतेने आणि कुणालाही ओळखू येणार नाहीत, असा पद्धतीने ते बसवतात येतात. ही बाब आंबट शौकिनांच्या पथ्थ्यावर पडत आहे.

अशी घ्यावी दक्षता
अडगळीचीजागा कापड आणि कागदाने झाकून टाका. तसेच चेजिंग रूममध्ये गेल्यानंतर लाइट बंद करूनच चेंज करा. कारण अंधारात कुठलाच कॅमेरा चित्रीकरण करू शकत नाही. लॉज, चेंजिंग रूम, प्रसाधनगृहे या ठिकाणी जाता क्षणी अडगळीच्या ठिकाणी किंवा छताच्या दिशेने फोन नेऊन कॉल लावा. कपडे बदलण्याची खोली पूर्ण बंद असणे गरजेचे आहे, याकडेही लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

यापूर्वीच्या ठळक घटना अशा
>फेब्रुवारी २०१५
मुंबईमधीलअंधेरीच्या प्रसिद्ध शिशा स्काय लाउंजच्या प्रसाधनगृहात एका मॉडेल तरुणीला बेसिनच्या खाली छुपा मोबाइल कॅमेरा आढळल्याने खळबळ उडाली होती. संबंधित आस्थापनाच्या मालकावर कारवाई केली गेली.
>डिसेंबर२०१४
भोपाळमधीलएका पेट्रोलपंपावरील महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आला होता. मोबाइल फोनच्या माध्यमातून तिने आजूबाजूला पाहिले असता एका प्लॅस्टिक पिशवीत छोटा छुपा कॅमेरा आढळून आला.
>डिसेंबर२०१३
मुंबईमधीलबॉम्बे रुग्णालयातील बाथरूमममध्ये दोन शिकाऊ महिला डॉक्टर अंघोळीसाठी गेल्या असता िंभंतीवर मोबाइल कॅमेरा ठेवलेला आढळला. त्या कॅमेऱ्यातून चित्रण सुरू होते.
>ऑक्टोबर२०१४
मुंबईच्यासायन रुग्णालयातही असाच प्रकार उघडकीस आला. महिला डॉक्टरांच्या बाथरूममध्ये कॅमेरा ठेवून त्यांचे चित्रीकरण केले जात असल्याचे उघडकीस आले.
>३०ऑगस्ट २०१३
मुलूंडच्याप्रख्यात डायग्नोस्टिक सेंटरमध्ये मोबाइलद्वारे चित्रीकरण केले जात असल्याचे महिलेच्या सतर्कतेमुळे उघड झाले होते.

काय काळजी घ्यावी?
>छुप्या पद्धतीने होणारे चित्रण रोखायचे असेल, तर चौकसपणा असायला हवा.
>शक्यतो अडगळीची जागा असेल तर सावध राहावे.
>कपडे बदलण्याची खोली पूर्ण बंद असणे गरजेचे आहे.