आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शेगावीचा योगी गजानन’चे लवकरच चित्रीकरण, नवोदित कलावंतांना मिळणार संधी,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यात संत गजानन महाराजांच्या भक्तांचा मोठा गोतावळा असून, महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित ‘शेगावीचा योगी गजानन’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणास जिल्ह्यात लवकरच प्रारंभ होत आहे. कस्तुरी फिल्म प्रॉडक्शन नरेश भुतडा प्रदर्शित या चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण अकोट, मुंडगाव, अकोला परिसरात होईल. या चित्रपटाची यापूर्वीच्या चित्रपटांपेक्षा वेगळी छाप पडेल, अशी माहिती चित्रपटाचे निर्माता दीपक गोरे यांनी दिली.

आज, २८ जानेवारीला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पारायणातील संपूर्ण २१ अध्याय या चित्रपटात पाहण्याचा योग गजाननभक्तांना उपलब्ध होणार आहे. चित्रपटाची निर्मिती अत्याधुनिक पद्धतीने होेत असून, स्पेशल इफेक्टमुळे श्रींचे सर्व चमत्कार प्रत्यक्ष अनुभवता येतील. चित्रपटात श्रींची भूमिका मुकुंद वसुले साकारत आहेत. त्यांनी शेगावीचा राणा गजानन माझा या महानाट्याचे राज्यात राज्याबाहेर शेकडो प्रयोग केले आहेत. त्यांच्या गाभ्रीचा पाऊस बाबू, बँड, बाजा या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आहेत, तर चित्रपटाचे दिग्दर्शन पितांबर काळे करत आहेत. त्यांनी आजवर ३८ मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले, त्यातील माहेरचा अहेर चित्रपट बहुचर्चित राहिला. चित्रपटाचे कथालेखन नागपूरचे लेखक नितीन नायगावकर यांनी केले आहे, तर पटकथा, निर्माते दीपक गोरे, संवाद आबा गायकवाड यांचे आहेत. चित्रपटाचे निर्मिती प्रमुख म्हणून अनुप गोरे काम पाहत आहेत. चित्रपटात मिलिंद गुणाजी, मोहन जोशी, विजय पाटकर, संजय खापरे, प्रेमा किरण, दीपाली सय्यद, पूनम विणकर हे काम करत आहेत. चित्रपटाचे संगीत नंदू होनप यांचे असून, गीतकार प्रवीण दवणे आहेत, तर पार्श्वगायन सुरेश वाडकर, वैशाली सावंत, बेला शेंडे, आदर्श शिंदे, अजित कडकडे यांचे आहे. चित्रपटात विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नवोदितांनाही संधी दिली जाणार असून, त्याकरिता लवकरच ऑडिशन घेण्यात येत आहे. फेब्रुवारीला अकोल्यात ऑडिशन होणार आहे. चित्रपटाचे मुख्य चित्रीकरण ते २५ मार्चदरम्यान अकोट शहराच्या आसपास होणार असून, ३०० तंत्रज्ञ, कलावंत सहभागी होणार आहेत, तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पत्रकार परिषदेला पितांबर काळे, पूनम विणकर उपस्थित होत्या.

संत गजाननांच्या सेवेसोबतच माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारी संधी
मीमुळात नृत्यांगना असून, माझे अनेक स्टेज शो होतात. मात्र, योगायोगाने मला मराठी चित्रपटात अभनियाची मिळालेली संधी ही अभनियाची नव्हे तर संत गजाननाची सेवा करण्याची संधी असल्याचे मत बायजाबाईची भूमिका बजावणाऱ्या पूनम विणेकर यांनी "दिव्य मराठी'शी संवाद साधताना व्यक्त केले. चित्रपटात एकमेव स्त्री पात्र असून, बायजाबाईची ही भूमिका माझ्याकडे आपसूकच चालून आली. मी वेसावरची पारू हा धम्माल नृत्य, गाण्यांचा कार्यक्रम करते. मी मूळची मुंबईची रहिवासी असून, मला बालपणापासून नृत्याची आवड आहे. त्यात अभनियाची मिळालेली संधी माझ्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरणार आहे, असेही त्या म्हणाल्या.