आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मयखान्याचे परवाने नूतनीकरणात ‘जाम’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहर व ग्रामीण भागातील अनेक बार मालकांना त्यांच्या बारचे नूतनीकरण झाल्याचे प्रमाणपत्र (लायसन्स) मिळाले नाही. लायसन्सशिवाय अनेक बार सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. जिल्हय़ात एसएल थ्री या वर्गवारीत 111 बार आहे तर सीएल थ्री या वर्गवारीत 30 देशी दारूचे दुकान आहे. यांपैकी अनेक बारचालकांना त्यांचे लायसन्स मिळाले नाही. बार मालकांना 1 मार्च रोजी हे प्रमाणपत्र मिळण्याची गरज होती.

दरवर्षी बार मालक एप्रिल महिन्यात शासकीय चलान या माध्यमातून नूतनीकरणासाठी आवश्यक लायसन्स फी सरकारला अदा करतात. त्यानंतर इतर सर्व प्रकारची खातरजमा केल्यानंतर नूतनीकरण केल्याचे प्रमाणपत्र राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत देण्यात येते. यंदा नूतनीकरण प्रमाणपत्र देण्यासाठी कधी नव्हे ते जिल्हा प्रशासनाने रस घेतल्याची माहिती मिळाली. अशा परिस्थितीत अनेक बारचे नूतनीकरण प्रमाणपत्र अद्याप प्राप्त झाले नसल्याची माहिती आहे. यंदा 30 एप्रिल ते 31 जून या कालावधीत तात्पुरते लायसन्स देण्यात आले होते. पण, ते ही प्रत्यक्षात अनेक बार मालकांना देण्यात आले नाही.

सर्व बारचे नूतनीकरण पूर्ण
जिल्हय़ातील सर्व बारचे नूतनीकरण झाले आहे. लायसन्सशिवाय बार सुरूच राहू शकत नाही. सर्वच प्रमाणपत्र वितरित केले आहेत, ते सर्वांना मिळतील. पी. ए. वाघे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.