आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharip Bhajun Mahasangh News In Marathi, Issue At Akola

भारिप बमसंच्या आमदारांना संधी तर अनेकजण रांगेतच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विधानसभानिवडणुकीत यंदाही भारिप बहुजन महासंघाची एकला चलो रे ची भूिमका जवळपास नििश्चत आहे. त्याबाबत पक्षाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले नसले, तरी राज्यात काँग्रेसचे उमेदवार जिथे असतील तेथे पक्षाचे उमेदवार दिल्या जातील, अशी भूिमका त्यांनी आधीच घेतल्याने काँग्रेससोबतच्या युतीला सध्यातरी पूर्णविराम आहे. मात्र, पक्षाच्या दोन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्याची भूिमका घेतल्याने आमदार कामाला लागले आहेत, तर मूर्तिजापूर, अकोट आणि अकोला पश्चिम मतदारसंघात अनेक इच्छुक बािशंग बांधून तयार आहेत.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांची उमेदवारी आणि अकोला पूर्वमधून आमदार हरिदास भदे यांची उमेदवारी निश्चित मानल्या जाते. त्यांना हिरवी झेंडी मिळाल्यामुळे त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये काम सुरू केले आहे, तर अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून डॉ. रहेमान खान यांची उमेदवारी पक्की असल्याची चर्चा भारिप कार्यकर्त्यांतून होत आहे. मात्र, मूर्तिजापूर मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे आणि पक्षाचा बेस अनुसूचित वर्ग असल्यामुळे या मतदारसंघात अनेक कार्यकर्त्यांना आमदारकीचे स्वप्न पडत आहेत. त्यात आघाडीवर युवा कार्यकर्ते राजेंद्र पातोडे, दामोदर जगताप, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, नाना वैराळे, ज्येष्ठ कार्यकर्ते डी. एन. खंडारे यांच्यासह भल्यामोठ्या नावांची यादी आहे, तर अकोट विधानसभा मतदारसंघातून प्रदीप वानखडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, काशिराम साबळे, प्रभाकर मानकर यांच्यासह अनेक इच्छुक आहेत. मात्र, उमेदवारीची दावेदारी करणे, फििल्डंग लावण्याला भारिप बहुजन महासंघामध्ये कुठलाही थारा नसल्यामुळे, जेथे बाळासाहेबांचा निर्णय तेथे कुणाचे चालेना, अशी परिस्थिती पक्षात असल्यामुळे कुणालाही उमेदवारीची लॉटरी लागू शकते. त्यामुळे भारिप-बमसंमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारकीचे वेध लागले आहेत.
बाळापूर, अकोला पूर्वमध्ये अजूनही अनेकांना आशाच अकोलापूर्वमधील भारिप-बमसं यंदा विद्यमान आमदारांना बदलवणार म्हणून, जोरदार वावड्या उठल्या . त्यामुळे पक्षातील अनेक दिग्गजांचा या मतदारसंघावर डोळा होता तसेच बाळापूरमधून कधी-कधी प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांचे नाव समाेर येत असल्यामुळे येथेही बदलाची शक्यता वर्तवल्या जात होती. त्याचे कारण होते की, यंदा प्रथमच अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत केवळ जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष वगळता कुणालाही रिपीट केले नव्हते. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघावर अनेकांना आशा होती आणि आजही असल्याचे दिसून येत आहे.