आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhartiya Sanvidhan Bachaw Samity Agitation For Buddhagaya Blast Issue

भारतीय संविधान बचाव समितीचे धरणे आंदोलन, बुद्धगया प्रकरणाबाबत सरकारचा निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - बुद्धगया येथे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपींना शोधण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. निवडणुकीत नुकसान होईल म्हणून आरोपींना पकडण्यात आले नाही, हे सरकारचे अपयश आहे, असा आरोप करत भारतीय संविधान बचाव समितीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

जुलै महिन्यात बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या परिसरात बॉम्बस्फोट झाले होते. त्यामध्ये दोन विदेशी भिक्खू गंभीर जखमी झाले होते. त्या घटनेला तीन महिने होऊनही बिहार सरकार आणि केंद्र सरकारला आरोपींचा छडा लावण्यात अपयश आले आहे, असा आरोप या वेळी विजय नरवाडे यांनी केला. या वेळी भन्ते विशाल कीर्ती यांनी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत, असे सांगितले.

या वेळी समितीने बॉम्बस्फोटाचा तपास लवकर करून गुन्हेगारांना पकडण्यात यावे, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. धरणे आंदोलनात भन्ते अश्वजित, भन्ते सुमंगल, प्रज्ञानंद उपर्वट, संजय खांडेकर, आकाश दंदी, प्रभाकर विरघट, सारंग तायडे, आदींनी सहभाग घेतला.