आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा: ‘स्वरसुधाकर’चे 30 ऑगस्टला अयोजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- गझलसागर प्रतिष्ठान, मुंबई व ललित कला अकादमी, अकोलाच्या वतीने अकोल्यातील ज्येष्ठ संगीतकार तथा सुप्रसिद्ध संवादिनीवादक सुधाकर अंबुसकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्याचे आयोजन 30 ऑगस्टला सायंकाळी 5 ते 10 या वेळेत प्रमिलाताई ओक सभागृहात करण्यात आले आहे, अशी माहिती गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी दिली.
येथील एका खासगी हॉटेलात आज 16 ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भीमराव पांचाळे पुढे म्हणाले की, गेली 45 वर्षे सुधाकर अंबुसकर मला साथसंगत करत आहेत. एवढय़ा प्रदीर्घ काळात आमच्यात कधीच बेबनाव झाला नाही. माझ्या गझलांना सजवण्याचे, फुलवण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे त्यांचा हा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा व तोही अकोल्यात आम्ही आयोजिला आहे. या वेळी सिनेदिग्दर्शक राजदत्त यांचेसह शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण शेळके उपस्थित राहतील. गझलसागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भीमराव पांचाळे, ललित कला अकादमीचे अध्यक्ष एन. एच. व्यास, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, सामाजिक कार्यकर्ते गणेश पोटे, ज्येष्ठ चित्रकार सतीश पिंपळे, सातव्या मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद सोनेवाणे, गझलकार र्शीकांत कोरान्ने व किशोर बळी यांची उपस्थिती लाभणार आहे. सोहळ्याचे मान्यवरांचे स्वागत, प्रास्ताविक, मानपत्राचे वाचन, सत्कार, मनोगत, सत्कारास उत्तर, अध्यक्षीय भाषण व आभार असे स्वरूप राहील. त्यानंतर सुधाकर अंबुसकर यांनी संगीतबद्ध केलेल्या रचना प्रतिभा पवित्रकार, अबोली गद्रे, प्रज्योत देशमुख, सानिका अग्निहोत्री, कीर्ती पिंपळकर, भाग्यर्शी पांचाळे हे गायक कलावंत सादर करतील. त्यानंतर होणार्‍या शास्त्रीय समूह वाद्यवादनाच्या (फ्युजन) मैफिलीत डॉ. देवेंद्र यादव (तबला), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), संदीप कपूर (गिटार), सुधाकर अंबुसकर (संवादिनी) आदी कलावंत रंग भरतील. समारोपाच्या मैफिलीत भीमराव पांचाळे त्यांना आवडलेल्या काही खास मराठी-उर्दू रचना पेश करणार आहेत.
अकोलेकरांसाठी विनामूल्य असलेल्या हा सोहळा पर्वणी असून, रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा. विनामूल्य प्रवेशिकांसाठी हॉटेल सेंटर प्लाझा, केडिया प्लॉट, फोटो आर्ट गॅलरी, रतनलाल प्लॉट किंवा गणेश इलेक्ट्रॉनिक्स, टॉवर चौक येथे संपर्क साधावा.