आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोला जिल्ह्यातील भोंदूस फसवणूक प्रकरणी बुलडाण्यात अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - पक्षाघात बरा करण्याच्या बहाण्याने दोन वर्षापासून बुलडाण्यातील एका कुटुंबाची आर्थिक फसवणूक करणार्‍या अकोला जिल्ह्यातील एका तांत्रिकास अंधश्रद्धा निर्मलून समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गुरूवारी पोलिसांच्या स्वाधीन केले. दोन वर्षात तांत्रिकाने पीडित कुटुंबाची दीड लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले.

ज्ञानदेव पातोडे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येत असलेल्या जामठी येथील तो रहिवाशी आहे. बुलडाणा शहरातील राहूल ससाणे यांचे वडिल उत्तम ससाणे यांना दोन वर्षापूर्वी पक्षाघात झाला होता. बरेच इलाज केल्यानंतरही तो बरा न झाल्याने ज्ञानदेव पातोडेची त्यांना माहिती मिळाली. गधेवाले बाबा म्हणून त्याला ओळखले जाते. त्याला भेटून ससाणे कुटुंबियांनी आजारी वडिलांवर उपचार सुरू केले. जून 2011 पासून ज्ञानदेव पातोडे राहूलच्या वडिलांवर उपचार करत होते. मात्र त्याउपरही त्यांच्यामध्ये फरक पडला नाही. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने राहूल ससाणेने अनिसच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. अनिसच्या कार्यकर्त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. 29 ऑगस्टला पोलिसांनी अनिसच्या कार्यकर्त्यांची मदत घेऊन ज्ञानदेव पातोडेला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बुलडाणा पोलिस करीत आहेत. 30 ऑगस्ट रोजी या तांत्रिकाची जमानतीवर सुटका करण्यात आली आहे. अनिसचे श्रीराम रसाळ, लक्ष्मण पवा, प्रभाकर वाघमोर, नरेंद्र लांजेवार, डॉ. इंदुमती लहाने, जिजा चांदेकर, डॉ. प्रतीभा व्यव्हारे, प्रा. शाहीना पठाण यानी मदत केली.