आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआर संचालकांची आज न्यायालयात पेशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को. क्रेडिट सोसायटी लि. चे १३ संचालक सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची पोलिस कोठडीची मुदत संपणार असल्यामुळे त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करणार येणार आहे. मात्र, या सर्व आरोपींवर राज्यांतील बहुतांश जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्यामुळे त्यांना अमरावती किंवा यवतमाळचे पोलिस चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत.

बीएचआरच्या ३४ संचालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. अटक करण्यात आलेले १३ संचालक जळगाव आणि जामनेर येथील आहेत. संचालक प्रमोद भाईचंद रायसोनी, इंद्रकुमार आत्माराम ललवाणी, सुकलाल शहादू माळी, डॉ. हितेंद्र यशवंत महाजन, मोतीलाल ओंकार गिरी, दादा रामचंद्र पाटील, दिलीप कांतीलाल चोरडिया , सूरजमल भूतमल जैन, भागवत संपत माळी, यशवंत ओंकार गिरी, शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार, राजाराम काशिनाथ कोळी आणि भगवान हिरामण वाघ हे जळगाव पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मात्र, अकोला शाखेतील अधिकारी आणि कर्मचारी मात्र, पोलिसांपासून लपून आहेत. या सर्व आरोपींचा पोलिस शोध घेत असून, त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. गुरुवारी सिटी कोतवाली पोलिस सोसायटीचे संस्थापक संचालक प्रदीप रायसोनी यांना चौकशीसाठी जळगावला घेऊन गेले होते. तक्रारदार गजानन धामंदे यांच्यासह २३ जणांनी गांधी रोडवर असलेल्या बीएचआरच्या शाखेत ७५ लाखांपेक्षा अधिक रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. त्यांना त्यांच्या ठेवी परत मिळाल्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रारी केल्या आहेत.