आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"भूमी अभिलेख'चे कामकाज मंदावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अकोट येथील भूमिअभिलेख कार्यालयाची इमारत.)
अकोट - कर्मचारी संख्या अपुरी, गावाचा वाढता व्याप आणि कमी पडत असलेल्या जागेमुळे अकोटमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाची गती मंदावल्याचे दिसत आहे. एकाच कामासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागत असल्याने हा त्रास आणखी किती दिवस सहन करावा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

शहरातील सोनू चौकात भूमी अभिलेख कार्यालय असून, कार्यालयात प्रवेश करण्यापासूनच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. कार्यालयाच्या समोरच एक मोठा खड्डा असून, त्यामध्ये पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे. तसेच पार्किंगचीही व्यवस्था नाही. कार्यालयामध्ये तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मालमत्तासंबंधी नोंदी, नक्कल काढणे कठीण होत आहे. त्यासोबतच शहर झपाट्याने वाढत असून, ग्रामीण भागातील अनेक नागरिक शहरामध्ये स्थायिक होत आहेत. त्यामुळे नवीन कॉलनी, नगर उदयास येत आहेत.
तसेच फ्लॅट संस्कृती रुजत असल्याने बहुमजली इमारती बांधण्यात येत आहेत. या सर्व मालमत्तांची नोंद करण्यासाठी संबंधित नागरिक भूमी अभिलेख कार्यालयात गेल्यास कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामास विलंब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, अभिलेखापाल अकोल्यावरून प्रतिनियुक्तीवर अकोटला येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दुसरामजला बांधण्याकरिता प्रस्ताव
वाढताव्याप लक्षात घेता कार्यालयीन जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे कार्यालयाच्या इमारतीवर दुसरा मजला बांधून मिळण्याकरिता वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

हीपदे आहेत रिक्त
कनिष्ठलिपिक, दुरुस्ती लिपिक, छाननी लिपिक, अभिलेखापाल, प्रतिलिपी लिपिक, शिपाई ही पदे रिक्त आहेत.

रिक्त पदांची समस्या लवकरच दूर होईल
अकोटच्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आणि जागेची समस्या वरिष्ठांना माहीत आहे. लवकरच या दोन्ही समस्या दूर होण्याची शक्यता आहे.'' विनोदजाधव, प्रभारीउपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, अकोट


बातम्या आणखी आहेत...