आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभयारण्यातील पक्ष्यांचीही होणार नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हिवाळ्यात अनेकविध प्रजातींचे स्थानिक, स्थानिक स्थलांतरित स्थलांतरित पक्षी अभयारण्यासह जलाशयांवर दिसतात. मात्र, त्यांची अधिकृतपणे नोंदच केली जात नव्हती. मात्र, आता ही नोंदीसाठी चांगले पाऊल उचलण्यात आले असून, अभयारण्यातील पक्षी प्रजातींची नोंद होणार आहे. राज्यातील अभयारण्यामध्ये २१ डिसेंबर २०१४ तसेच ११ जानेवारी २०१५ या दोन तारखांना हे पक्षी निरीक्षण होणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक क्षेत्रसंचालक यांनी एक नवीन पाऊल उचलले असून, आता अभयारण्यातील पक्ष्यांचीही नोद केली जाणार आहे. यामध्ये पाच डिव्हिजनचा समावेश करण्यात आला आहे. तसेच विशिष्ट तारीख, वेळेत पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम राबवण्याच्या सूचना उपवनसंरक्षकांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये अभयारण्यासह त्यांतील पाणवठे, जलाशय, नदी-नाले, तलावांवर पक्षी निरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षी निरीक्षक, तज्ज्ञांसह स्थानिक स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये सकाळपासून विविध गट करून ठिकठिकाणी पक्षी निरीक्षण करण्यात येईल. तसेच यादरम्यान आढळून आलेले स्थानिक पक्षी, स्थानिक स्थलांतरित पक्षी तसेच हिवाळ्यामुळे जलाशयांवर आलेले परदेशातून स्थलांतरित करून आलेले पक्षी यांची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे अभयारण्यातील पक्षीवैभव निसर्गप्रेमी, पर्यटकांसमोर येणार आहे.

येथे पक्षी निरीक्षण
गुगामलवाइल्डलाइफ डिव्हिजनमध्ये कोहा ते बुलकुंड, ढाकना परिसरात, अकोट वन्यजीव क्षेत्रात गुल्लरघाट धरण, वारी धरण, नदी, अकोला वन्यजीव विभागात पलडग धरण, माटुंगा धरण, काटेपूर्णा धरण तर पूर्व मेळघाटमध्ये चंद्रभागा, चिखलदरा परिसरात निरीक्षण करण्यात येईल.
काटेपूर्णात १२३ प्रजाती
काटेपूर्णाअभयारण्यात यापूर्वी पक्षी तज्ज्ञ डॉ. जयंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात उपवनसंरक्षक विजय गोडबोले, साहाय्यक वनसंरक्षक रमेशप्रसाद दुबे यांनी पक्षी निरीक्षण करून पक्षी प्रजातींची नोंद केली. त्यानुसार अभयारण्यात १२३ पक्षी प्रजाती आढळून आल्या होत्या. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.