आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Nitin Gadkari News In Marathi, Developed Vidarbha Issue, Divya Marathi

गडकरींनी विदर्भाचा सर्वांगीण विकास करावा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या एक दिवस आधीच केंद्रीय मंत्रिपदाचे गिफ्ट मिळाले आहे. गडकरी यांनी राज्यात मंत्री असताना उत्कृष्ट कार्य केले. तसेच काम आता करून देशासह विदर्भाचा सर्वांगीण विकास करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मोदी सरकारमध्ये विदर्भातून एकमेव गडकरींचा समावेश आहे. त्यामुळे विदर्भाचा सर्वांगिण विकास ते करतील अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या आहेत.

विकासाची पोकळी भरून काढावी
अनेक वर्षांपासून विदर्भाचा विकास खुंटला आहे. आता विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ नये. विकासाची ही झालेली पोकळी भरून काढावी. नितीन गडकरी यांनी याबाबत पुढाकार घ्यावा.
तेजराव थोरात, जिल्हाध्यक्ष भाजप

प्रत्येक ठिकाणी समान विकास
विदर्भासाठी कोणतीही योजना करताना सर्व ठिकाणी समान प्रमाणात होईल याकडे नितीन गडकरी हे जातीने लक्ष देतील, असा विश्वास वाटतो.
संध्या पाटील
विदर्भाच्या विकासाची अपेक्षा
केंद्रात यापूर्वी विदर्भाला प्रतिनिधित्व मिळाले नाही, असे नाही. परंतु, गडकरींसारख्या नेत्याचा समावेशाने विदर्भाच्या विकासाची त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. राम पाटील, शाखा अभियंता.
स्वतंत्र विदर्भाचे स्वप्न
स्वतंत्र विदर्भ होण्याचे स्वप्न आता नितीन गडकरी पूर्ण करतील. मिहान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे राबवला. त्यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या.
अँड. गिरीश गोखले, भाजप.
चौपदरीकरणाच्या कामाला गती येईल
अमरावतीपासून ते धुळ्यापर्यंत रखडलेले राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती येईल तसेच गडकरींना सर्व जिल्ह्यांचा अभ्यास आहे. ते समस्या सोडवतील.
आमदार गोवर्धन शर्मा
महामार्गाचे चौपदरीकरण करावे
अमरावतीपासून रखडलेले महामार्ग चौपदरीकरण मार्गी लावावे. अकोल्याच्या विमानतळाचा प्रश्न सोडवण्यासाठी पीकेव्हीची जमीन संपादनाची प्रक्रिया त्वरित करावी. अशोक गुप्ता, अध्यक्ष, ऑइल मिल असोसिएशन.
विकासाचा बॅकलॉग भरून काढतील
गडकरी हे अभ्यासू, कल्पक असल्यामुळे त्यांचा विदर्भाला फायदा होईलच. पण, देशालाही मोठा फायदा होणार आहे. विकासाचा बॅकलॉग ते भरून काढणार आहेत.
आमदार हरीश पिंपळे
निश्चितपणे ‘अच्छे दिन’ येतील
गडकरींसारखा नेता केंद्रात विदर्भाचे नेतृत्व करणार असल्याने विदर्भासाठी तरी निश्चितपणे ‘अच्छे दिन’ येतील. गडकरींची कामाची चुणूक ते बांधकाममंत्री असताना पाहिली आहे.
पुरुषोत्तम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते.
विदर्भाच्या दृष्टीने गौरवास्पद बाब
गडकरींच्या रुपाने त्यांच्या रूपाने महाराष्ट्रातून अभ्यासूवृत्तीच्या नेत्याला देशाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले. ही विदर्भाच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे.
कमलेश वोरा, अध्यक्ष, विदर्भ चेंबर ऑफ कॉर्मस .
रस्त्यांच्या बाबतीत फायदा होईल
रस्त्याच्या बाबतीत त्यांचा निश्चितच फायदा होईल. त्यांच्याकडून प्रत्येक नागरिकाला अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा ते पूर्ण करतीलच. महाराष्ट्राला ते झुकते माप देतील यात शंकाच नाही.
श्रीकृष्ण नारखेडे, मुख्याध्यापक
महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत
महाराष्ट्राचा आवाज आता दिल्लीत गुंजणार आहे. युतीच्या सत्ता काळात जसा विकास झाला तसा तो आता देश पातळीवर होईल. विकासासाठी गडकरींकडे आशेने पाहिले जात आहे.
डॉ. रणजित पाटील आमदार.
विदर्भाला फायदा होईल
नितीन गडकरी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशामुळे विदर्भाचा विकास होईल. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी केलेली कामे उल्लेखनीय आहेत. त्यांना जे खाते मिळेल त्या खात्याला ते पूर्ण न्याय देतील आणि विकास करतील, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
संजय इंगळे, मुख्याध्यापक
आता होणार विकास
मिहान प्रकल्प गडकरी यांनी खेचून आणला. पश्चिम विदर्भात विकासासाठी त्यांच्याकडे जनता आशेने पाहत आहे. विदर्भ विकासाचे त्यांचे स्वप्न हे आमचे स्वप्न राहणार आहे.
संजय गावंडे आमदार, अकोट.
वेगळ्या विदर्भाच्या आशा पल्लवित
विदर्भातील दहाही जागा महायुतीच्या पारड्यात घेऊन गडकरी केंद्रात विदर्भाचे प्रतिनिधित्व करत आहेत. लहान राज्यांना अनुकूल असलेल्या एनडीएचे शासन आल्यामुळे वेगळ्या विदर्भ राज्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आमच्यासाठी तर गडकरी म्हणजे नरेंद्र मोदीच आहेत.
रोहन भिडे (बँक अधिकारी)
विदर्भाचा विकास करावा
राज्यात बांधकाममंत्री असताना गडकरींनी उड्डाण पूल, एक्स्प्रेस हायवेची कामे झाली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. विदर्भाचा विकास करावा.
अनहल कुरेशी, व्यावसायिक.
कामाची चुणूक देशात दाखवून द्यावी
गडकरींनी राज्य मंत्रिमंडळात असताना बांधलेले पूल, रस्त्यांची कामे सर्वर्शुत आहेत. तोच कामाचा वेग आणि तशीच चुणूक त्यांनी त्यांना मिळणार्‍या खात्यात देशात दाखवून द्यावी.
वसंत बाछुका, अकोला
आता होतील आमच्या अपेक्षा पूर्ण
विदर्भातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात गडकरी यशस्वी ठरतील. विदर्भाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष पाहता हा विकास जोमाने करण्यात ते अग्रेसर राहतील.
शंतनू जोशी, संचालक, अकोला अर्बन बँक.
देशासह विदर्भाचा विकास होणार
आम्ही गडकरी त्यांच्यासोबत नुकतेच दिल्लीत शपथविधी सोहळ्यातून बाहेर आलो आहोत. उद्या, नागपूर येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त व मंत्री झाल्यानंतर जंगी स्वागत होणार आहे.
वसंत खंडेलवाल उद्योजक,अकोला
पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या
विदर्भ औद्यौगिकदृष्ट्या मागास आहे. नवे उद्योजक येथे येण्यास तयार नाही. पायाभूत सुविधा या भागात उपलब्ध करुन दिल्यास विकासाला चालना मिळेल. रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा.
निकेश गुप्ता, उद्योजक.
चांगले कार्य करतील
गडकरी राज्यात कॅबिनेट मंत्री असताना त्यांनी बांधकाम खाते व पायाभूत सुविधा उभारणी क्षेत्रात चांगले कार्य केले. तशाच कार्याची अपेक्षा आता त्यांच्याकडून देशात विविध क्षेत्रांत अपेक्षित आहे.
नवल केडिया, शेअर ब्रोकर, अकोला