आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘भाजप’ची नवी ‘इनिंग’, कार्यालयाच्या लोकार्पणासाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - वास्तुशास्त्रानुसार नूतनीकरण करण्यात आलेल्या भाजप कार्यालयाच्या लोकार्पणासाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. सोमवारी, गणेशोत्सवानिमित्त पक्षाच्या नवीन कार्यालयात सत्यनारायणाची पूजा करून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

पक्षाने निवडणुकांमध्ये यश मिळावे म्हणून जिल्हा कार्यालयाचे वास्तुशास्त्राचा आधार घेत नूतनीकरण केले आहे. याचा शुभारंभ गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. पक्षाचे जिल्हा कार्यालय अनेक वर्षांपासून गांधी मार्गावरील चांदेकर भवनमध्ये आहे. आता जिल्हा परिषद, लोकसभा व विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष कार्यालय वास्तुशास्त्रानुसार सुसज्ज व हायटेक करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. खासदार संजय धोत्रे यांच्या पुढाकाराने वास्तुशास्त्र तज्ज्ञ व इतर अभियंत्यांच्या सल्ल्यानुसार कार्यालयात फेरबदल करण्यात आलेत. सोमवारी सकाळी 9 वाजता खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, डॉ. रणजित पाटील, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, डॉ. अशोक ओळंबे यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात येणार आहे.