आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पदृष्टीधारक गाठणार आर्थिक सक्षमता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अल्पदृष्टीधारकांसाठी कार्य करणार्‍या क्षितिज विरंगुळा केंद्राने अपंग दिनाच्या पूर्वसंध्येला 2 डिसेंबरला नव्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ केली. कागदाच्या पत्रावळी व द्रोण बनवण्याच्या या प्रकल्पाचा शुभारंभ वासुदेव मिशनचे अजितदादा कृष्ण तुकदेव यांच्या हस्ते करण्यात आला.
क्षितिज विरंगुळा केंद्र अल्पदृष्टीधारकांसाठी कार्य करते. ज्यांना अल्पदृष्टी आहे, त्यांना वाचन, लेखनात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगतीही खुंटते. तसेच अशांना वेळ देण्यास कुणाजवळही वेळ नसतो. त्यासाठी क्षितिज विरंगुळा केंद्राने पुढाकार घेतला. या केंद्रात आज अनेक अल्पदृष्टीधारक किंवा दृष्टीहीन विद्यार्थी असून, त्यांना क्षितिजच्या मंजुर्शी कुळकर्णी, उदय कुळकर्णी आदींसह अनेकांकडून वेळ व मार्गदर्शन होते. सातवी, आठवीपासून दाखल झालेले हे विद्यार्थी आता पदवीपर्यंत पोहोचले आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या रोजगाराचा प्रo्न सोडवण्यासाठी विश्वास पातुरकर व संदेश पातुरकर यांनी एक मशीन उपलब्ध करून दिली. या आधुनिक मशीनच्या साहाय्याने कागदी पत्रावळी व द्रोण बनवणे शक्य झाले आहे. अपंग दिनापासून वेद वासुदेव प्रतिष्ठान व क्षितिज फाऊंडेशनतर्फे हा प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन वेद वासुदेव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित तुकदेव यांनी मशिनीचे पूजन व पत्रावळ, द्रोण बनवून केले.
कार्यक्रमास मशीन उपलब्ध करून देणारे विश्वास पातुरकर, संदेश पातुरकर, गोविंद कुळकर्णी, मंजुर्शी कुळकर्णी, अतुल करंबेळकर, पल्लवी करंबेळकर, मनोज देशमुख, कीर्ती कुळकर्णी, स्मिता घळसासी, प्रदीप काळे, शुभांगी काळे, सुषमा सोमण आदींची उपस्थिती होती.