आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएलओंची केंद्रांवर दांडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मतदार यादी अद्ययावतीकरण कार्यक्रमादरम्यान शहरातील बंद असलेले मतदान केंद्र.)
अकोला - जिल्हानिवडणूक विभागाच्या वतीने रविवारी आयोजित मतदार यादी अद्ययावतीकरण कार्यक्रमादरम्यान शहर तसेच जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर मतदान केंद्राधिकारी अर्थात बीएलओंनी दांडी मारल्याचे दिसून आले. खुद्द जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या आदेशाकडे शासनाचेच प्रतिनिधी असलेल्या बीएलओंच्या अनुपस्थितीने निवडणूक कामात अडथळा झालेला दिसून आला. यामुळे हजारो मतदारांना हेलपाटे सहन करावे लागले.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान कार्ड आधार कार्ड लिंकअप करण्यासोबतच मतदार यादी अद्ययावतीकरणासाठी जिल्हाधिकांनी २८ जून रोजी मतदार यादी अद्ययावतीकरण मोहिमेचे आवाहन केले होते. जिल्हाधिकांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदार मतदान केंद्रावर पोहोचले, मात्र मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारीच अनुपस्थित असल्याचे आढळून आले. शहरातील प्रभाग क्रमांक १७, सिंधी कॅम्प, महापालिकेची शाळा क्रमांक १६, आदर्श कॉलनी, गुरुनानक विद्यालय, नगर परिषद कॉलनीसह अकोला तालुक्यातील बोरगावमंजू येथील उर्दू हायस्कूल मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारी अनुपस्थित होते. पावसाळ्याचे दिवस असताना मतदारराजा आपल्या कुटुंबातील सर्व मतदारांना घेऊन मतदान केंद्रासमोर ताटकळत उभे होते. मात्र, शालेय प्रशासनाने हात वर करत हा महसूल विभागाचा इव्हेंट असून, बीएलओंना बोलावण्याची तसदी घेतली नाही, हे विशेष.

तहसीलदारांनाहीनो रिस्पॉन्स
नगरसेवकआशिष पवित्रकार यांनी तहसीलदार संतोष शिंदे यांना फोन करून माहिती दिली. तेव्हा तहसीलदारांनी मतदान केंद्रावरील नियुक्त केलेल्या बीएलओंना फोन केले. मात्र, त्यांच्याही मोबाइलला बीएलओंनी प्रतिसाद दिला नाही.

नगरसेवकानेगोळा केले अर्ज
प्रभागक्रमांक १७ मधील एकाही मतदान केंद्रावर बीएलओ हजर झाला नाही. नागरिकांची गर्दी असल्याने नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी स्वत: तहसीलदार संतोष शिंदे यांना फोनवरून माहिती दिली. याशिवाय आलेल्या मतदारांचे अर्ज गोळा करून घेतल्यानंतर नागरिक शांत झाले.
बीएलओंवर कारवाई होईल काय?

निवडणूककाळात दिरंगाई करणांवर निवडणूक अधिकारी सक्त कारवाई करतात. मग निवडणुकीच्या या उपक्रमात दिरंगाई करणा मतदान केंद्राधिकांवर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत आता काय कारवाई करतात, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

चौकशी करणार
मतदानकेंद्राधिकांची चौकशी केली जाईल. बीएलओंच्या हलगर्जीमुळे मतदारांना त्रास झाला याची आम्हाला खंत आहे. संतोषशिंदे, तहसीलदार

नेहमीचेच आहे
शासनाचे नेहमी असेच असते. आवाहन करायचे नंतर प्रतिसाद द्यायचा नाही. त्रास मात्र नागरिकांनाच सहन करावा लागतो. आता पुन्हा टोले घ्यावे लागणार.'' निशिकांतबडगे
कारवाई व्हावी

मतदानकेंद्रावर अनुपस्थित राहिल्याप्रकरणी बीएलओंवर कारवाई व्हावी. जेणेकरून पुन्हा असा प्रकार घडणार नाही. आशिष पवित्रकार

कुणी आले नाही
दोनते तीन तास मतदान केंद्रावर थांबलो, पण कुणीही अाले नाही. यापूर्वीही असेच झाले होते. या वेळेस तरी बीएलओंनी केंद्रावर हजर राहायला हवे होते.'' छोटू देशमुख

कुत्रंही फिरकलं नाही
जिल्हाधिकांनी केलेल्या आवाहनाची बातमी पाहून आलो. चला, आपलेही कार्ड आधार कार्डसोबत लिंकअप करू, असे ठरवले होते. मात्र, मतदान केंद्रावर कुत्रंही फिरकलं नाही. या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे. '' राजेशतायडे
बातम्या आणखी आहेत...