आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्ब सापडला, गोळीबार झाला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - रेल्वेस्थानक परिसरात गोळीबार झाला.. या अफवेतून अकोलेकर सावरत नाहीत तोच संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास शहरात बॉम्ब सापडला... पळा पळा, अशी जोरदार चर्चा सुरू झाली व नागरिक भयभीत झाले. मात्र, या दोन्हीही घटनांमध्ये काहीही तथ्य आढळले नसून, त्या अफवाच होत्या. त्यामुळे शहरात सोमवारी अफवांच्या बाजाराला ऊत आला होता. या वेळी मात्र पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

सोमवारी सकाळी 11 वाजता अतिक्रमण मोहिमेदरम्यान, जसनागरा हॉटेलचे हॉटेल मालक व कर्मचा-यांमध्ये बाचाबाची झाली. मात्र, गोळीबार झाल्याची चर्चा संपूर्ण शहरात वा-यासारखी पसरली. पुन्हा दुपारी चार वाजताच्या सुमारास बसस्थानका शेजारील मुख्य डाकघरासमोर उभ्या असलेल्या एका लाल रंगाच्या स्कुटीवर बेवारस अवस्थेत सुटकेस आढळून आली. डाकघरातील काम आटोपून आल्यानंतर गायत्रीनगरमध्ये राहणा-या संदीप देशमुख यांना त्यांच्या स्कुटीवर बेवारस सुटकेस असल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांनी सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिस, बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डाकघराच्या मागील महापालिकेच्या शाळेच्या प्रांगणात सुटकेस नेली. यंत्राच्या साहाय्याने सुटकेस उघडून पाहिली असता त्यात समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष मुकुंद खैरे यांची कागदपत्रे असल्याचे आढळून आले.

चोरट्याने सुटकेस नेली होती चोरून
समाज क्रांती आघाडीचे मुकुंद खैरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन होते. उपोषण मंडपाच्या शेजारी उभ्या केलेल्या त्यांच्या कारमध्ये त्यांनी कागदपत्रांनी भरलेली, 35 हजार रुपये असलेली सुटकेस ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची सुटकेस लांबवली. चोरट्याने पैसे काढून घेतल्यानंतर ती सुटकेस डाकघरासमोरील एका दुचाकीवर ती ठेवून दिली होती. या घटनेची तक्रार रात्री ‘समाजक्रांती’चे मुकुंद खैरे यांनी सिटी कोतवाली पोलिसांना दिली.